Gadchiroli : सुनेनं घरातल्या 5 जणांना कसं संपवलं? गडचिरोली पोलिसांनी क्रॅक केला थरारक घटनाक्रम
- Published by:Shreyas
Last Updated:
गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील मौजा महागावमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गूढ मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. घरातील सून आणि मेहुण्याच्या पत्नीने कट करून सगळ्यांना विष पाजल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
गडचिरोलीच्या कुंभारे कुटुंबातील आई, वडील, मुलगा, मुलगी आणि मावशी यांचा 20 दिवसांच्या आत मृत्यू झाला. शंकर कुंभारे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंभारे यांची 20 सप्टेंबरला अचानक प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना चंद्रपूर आणि मग नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शंकर कुंभारे यांचं 26 सप्टेंबरला आणि विजया कुंभारे यांचं 27 तारखेला निधन झालं.
advertisement
advertisement
advertisement
शंकर आणि विजया रुग्णालयात असल्यामुळे मदतीला आलेल्या मेहुणीच्या मुलालाही विषबाधा झाली, त्याच्यावरही उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. उपचार सुरू असलेल्यांच्या हाता-पायाला मुंग्या येणे, कंबरेखालच्या भागात आणि डोक्यात प्रचंड वेदना, ओठ काळे पडणे, जीभ जड होणे, अशी लक्षणं दिसून आली. या लक्षणांमुळे मृत्यू झालेल्या आणि उपचार घेत असलेल्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला.
advertisement
advertisement
advertisement
रोझा रामटेकेने तेलंगणामध्ये जाऊन विष आणलं. हे विष दोघींनी कुटुंबातल्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळलं. या विषाचा परिणाम हळूहळू होऊ लागला, त्यानंतर घरातले सगळेच आजारी पडायला लागले. राकेश मडवी हा कुंभारे परिवारातील नव्हता, पण गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी प्यायलामुळे तोही आजारी पडला.









