जालन्याला टाळं! ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, APMC मार्केट बंद!

Last Updated:
Jalna Market: जालना मार्केट आज बंद राहणार आहे. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
1/5
राज्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांचा देखील आक्रोश पाहायला मिळत आहे. जालन्यातील देव मूर्ती शिवारात मागील 75 दिवसांपासून शेतकरी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून आंदोलन करत आहेत.

advertisement
2/5
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी आणि आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील आणि शहरातील व्यापाऱ्यांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

3/5
जालना शहरात असलेलं भुसार मार्केट आज 16 जुलै रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी कोणत्याही प्रकारचा भुसार शेतमाल बाजारपेठेत घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

4/5
दरम्यान, समृद्धी महामार्गात जालना शहराजवळील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या जमिनीचा शासकीय दर अत्यंत कमी आहे. परंतु खाजगी व्यवहारांमध्ये जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. जमिनीची सध्या होत असलेले व्यवहार लक्षात घेऊन सरकारने व्यवहारी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

5/5
आज सकाळी 11 वाजता शेतकरी बैलगाडी ट्रॅक्टर आणि जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील दिलीप राठी यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement