advertisement

IPL 2026 : जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19व्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर 31 मे रोजी आयपीएलची फायनल होईल.

जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
बंगळुरू : आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19व्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर 31 मे रोजी आयपीएलची फायनल होईल, पण सध्या फक्त 12 मार्चपर्यंतच्याच सामन्यांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांमुळे फक्त 12 एप्रिलपर्यंतच्याच सामने जाहीर करण्यात आले आहेत.
आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी त्यांचं घरचं मैदान असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळेल का नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती, कारण आयपीएल 2025 च्या व्हिक्ट्री परेडवेळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली.
आयपीएल 2025 मध्ये आरसीबी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती. यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 50 जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीनंतर बंगळुरूमध्ये एकाही सामन्याचं आयोजन केलं गेलं नाही.
advertisement
सामना क्रमांकठिकाणसंघतारीखवेळ
1बेंगळुरूरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबादशनिवार, 28 मार्च7:30 PM
2मुंबईमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्सरविवार, 29 मार्च7:30 PM
3गुवाहाटीराजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्ससोमवार, 30 मार्च7:30 PM
4न्यू चंदीगडपंजाब किंग्स vs गुजरात टायटन्समंगळवार, 31 मार्च7:30 PM
5लखनऊलखनऊ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्सबुधवार, 1 एप्रिल7:30 PM
6कोलकाताकोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबादगुरुवार, 2 एप्रिल7:30 PM
7चेन्नईचेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्सशुक्रवार, 3 एप्रिल7:30 PM
8दिल्लीदिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्सशनिवार, 4 एप्रिल3:30 PM
9अहमदाबादगुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्सशनिवार, 4 एप्रिल7:30 PM
10हैदराबादसनरायझर्स हैदराबाद vs लखनऊ सुपर जायंट्सरविवार, 5 एप्रिल3:30 PM
11बेंगळुरूRCB vs चेन्नई सुपर किंग्सरविवार, 5 एप्रिल7:30 PM
12कोलकाताकोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्ससोमवार, 6 एप्रिल7:30 PM
13गुवाहाटीराजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्समंगळवार, 7 एप्रिल7:30 PM
14दिल्लीदिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्सबुधवार, 8 एप्रिल7:30 PM
15कोलकाताकोलकाता नाईट रायडर्स vs लखनऊ सुपर जायंट्सगुरुवार, 9 एप्रिल7:30 PM
16गुवाहाटीराजस्थान रॉयल्स vs RCBशुक्रवार, 10 एप्रिल7:30 PM
17न्यू चंदीगडपंजाब किंग्स vs सनरायझर्स हैदराबादशनिवार, 11 एप्रिल3:30 PM
18चेन्नईचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्सशनिवार, 11 एप्रिल7:30 PM
19लखनऊलखनऊ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्सरविवार, 12 एप्रिल3:30 PM
20मुंबईमुंबई इंडियन्स vs RCBरविवार, 12 एप्रिल7:30 PM
advertisement
सुरक्षेच्या कारणामुळे बंगळुरूच्या प्रशासनाने चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करायला परवानगी दिली नव्हती. अखेर सुरक्षेचे सगळे नियम पाळल्यानंतर बंगळुरूच्या प्रशासनाने आयपीएल 2026 चे सामने बंगळुरूमध्ये आयोजित करायला परवानगी दिली आहे.

आरसीबीची टीम

रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, जॉश हेजलवूड, कृणाल पांड्या, टीम डेव्हिड, स्वप्नील सिंग, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, व्यंकटेश अय्यर, सात्विक ओत्सवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, जॉर्डन कॉक्स, रसिख दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, अभिनंदन सिंग, जेकब डफी, यश दयाळ
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement