Kolhapur News : पौर्णिमेच्या रात्री अघोरी प्रकार! स्थानिकांना संशय आल्याने भांडाफोड, पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथल्या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी)
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथल्या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री अघोरी कृत्याचा अग्नी पूजा रंगली होती. एका मांत्रिकासह 10 ते 15 जणांच्या उपस्थितीत अघोरी यज्ञ पार पडला. गावातील तरुणांना याची कुणकुण लागताच त्यांनी पडताळणी केल्यानंतर हा भानामती करणीचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मांत्रिकसह यात सहभागी काही जणांना कुरुंदवाड पोलीसाच्या स्वाधीन केले. या प्रकाराने गावात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
advertisement
इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी जायला निघाली, येथील हनुमान मंदिर जवळ लावण्यात आलेल्या एमएच 10 पासिंग असलेल्या मोटरसायकल तसेच एक रिक्षा होती. या सर्वांचा गावातील युवकांना संशय आला. त्या युवकांनी त्यांना हे काय केलंय असे विचारले असता त्यांनी पूजा केल्याचे सागितले. त्यांनतर त्यांची अधिक चौकशी करीता विधी केलेले ठिकाण पाहिले असता तेथे अघोरी कृत्य दिसून आले.
advertisement
advertisement


