Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार ; मुंबईवर जमले काळे ढग, हवामान विभागाचा रेड अलर्ट

Last Updated:
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या खोल दाबाचं आता भीषण चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला रेमल हे नाव देण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रेमल चक्रीवादळ आज मध्यरात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर येऊन धडकेल.
1/7
रेमल चक्रीवादळ कधीही धडकणार असल्यामुळे हवामान विभागाने बंगालमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेची उपाययोजना म्हणून समुद्रा काठच्या नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करायला सुरूवात झाली आहे.

advertisement
2/7
मान्सूनआधी बंगालच्या उपसागरामध्ये येणारं हे पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.

3/7
रेमल चक्रीवादळाचा मुंबईत येऊ घातलेल्या मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही. या महिन्याच्या शेवटी मुंबईत पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 10-11 जूनच्या आसपास दक्षिण-पश्चिम मान्सून मुंबईत दाखल व्हायचा अंदाज आहे.

4/7
आयएमडी मुंबईचे संचालक सुनिल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे पर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहोचेल. हाच मान्सून मुंबईत पोहोचायला 10 ते 11 जून उजाडेल.

5/7
महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाला सुरूवात होऊ शकते. 5 जूनच्या आसपास मान्सून दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो. हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

6/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरण राहिल, तसंच काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडी मुंबईने दिला आहे.

7/7
पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस होऊ शकतो. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 27 ते 29 मे दरम्यान हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement