advertisement

Dhurandhar 2 च्या निर्मात्यांना फुटला घाम, पहिल्याच दिवशी 102 कोटींची कमाई करूनही फिल्म FLOP! नक्की काय घडलं?

Last Updated:
Dhurandhar 2 FLOP: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटींची कामगिरी करणारा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरला असला, तरीही धुरंधरसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
1/10
मुंबई : काल १९ मार्चला रिलीज झालेल्या 'धुरंधर २' ला गुढी पाडव्याचा मुहूर्त शुभ ठरल्याचं दिसतंय. पहिल्याच दिवशी या फिल्मने धुवांधार कमाई करत रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली आहे. रिलीजच्या दिवशीच या फिल्मने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धूर काढला आहे.

2/10
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटींची कामगिरी करणारा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरला असला, तरीही धुरंधरसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल २५० ते २७५ कोटींमध्ये बनलेल्या या फिल्मने पेड प्रिव्ह्यू तब्बल १४५ कोटींची कमाई केली असून पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा १०२ कोटींहून अधिक आहे.

3/10
असे असले, तरीही साऊथमध्ये धुरंधरची जादू फिकी पडल्याचं पाहायला मिळालं आहे. या चित्रपटाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की त्याला एक कोटीचा गल्ला जमवणंही कठीण झालं आहे.

4/10
धुरंधरची टीम सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या फिल्मच्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अशातच दुसऱ्या भागाची क्रेझ पाहता ही फिल्म मागच्या भागाचे सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याची खात्री निर्मात्यांना आहे.

5/10
मात्र, साऊथकडील चित्रपटाची कामगिरी पाहता निर्मात्यांना धक्का बसला आहे. विशेषतः दोन राज्यांमध्ये तर या चित्रपटाची अवस्था इतकी बिकट आहे की, तिथे साध्या लाखांतही कमाई करणं कठीण झालं आहे.

6/10
पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता धुरंधरचा दुसरा भाग पाच भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. मात्र हा निर्णय फसल्याचं पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून पाहायला मिळतंय. 'धुरंधर २' च्या पहिल्या दिवसाची एकत्रित कमाई झाली आहे, त्यातील सर्वांत मोठा वाटा हा हिंदी भाषेतील फिल्मचा आहे.

7/10
हिंदी भाषेत चित्रपटाने जवळपास ९९ कोटींची विक्रमी कमाई केली. मात्र, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपटाची अवस्था चिंताजनक आहे. तेलुगु भाषेत या फिल्मचं कलेक्शन २.१२ कोटी रुपये, तमिळमध्ये १.१६ कोटी रुपये, मल्याळममध्ये फक्त ९ लाख रुपये आणि कन्नडमध्ये फक्त ८ लाख रुपये इतकं आहे.

8/10
कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांत रणवीरच्या चित्रपटाला एक कोटीचा आकडाही गाठता आला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारतातील प्रादेशिक चित्रपटांसोबत झालेली टक्कर. 'धुरंधर २' सोबत कोणताही मोठा बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला नसला तरी, साऊथच्या सुपरस्टार्सनी मात्र रणवीरला जोरदार टक्कर दिली आहे.

9/10
पवन कल्याणच्या 'उस्ताद भगतसिंग' या तेलुगु चित्रपटाने पहिल्याच दिवशी तेलगूमध्ये ३१.५० कोटींची नेट कमाई केली. तर केरळमध्ये 'आडु ३' या मल्याळम चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटी कमावले, जिथे धुरंधरला साधे १० लाखही जमले नाहीत. तमिळनाडूमध्ये 'युथ' या तमिळ चित्रपटाने ३.२० कोटींची ओपनिंग घेतली. कर्नाटकमध्ये 'लव मॉकटेल ३' या कन्नड सिनेमाने दीड कोटी कमावून 'धुरंधर २' ला मागे टाकलं.

10/10
'धुरंधर २' ला पॅन-इंडिया चित्रपट म्हणून प्रमोट केलं गेलं होतं. चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दक्षिणेतही लोकप्रिय असलेले चेहरे होते. तरीही साऊथच्या प्रेक्षकांनी बॉलीवूडच्या या स्पाय युनिव्हर्सपेक्षा आपल्या मातीतील सिनेमांना पसंती दिली आहे. उत्तर भारतात जिथे प्रत्येक शो हाऊसफुल्ल आहे, तिथे दक्षिणेत या फिल्मची चित्रपटगृहे रिकामी दिसत आहेत.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement