सेम पुष्पा सिनेमासारखी तस्करी, वनविभागाचा कर्मचारीच झाला सामील, गडचिरोलीच्या जंगलात मोठं कांड PHOTOS

Last Updated:
पुष्पाभाऊ ज्या प्रकार चंदनाची चोरी करण्यासाठी डोक लावत होता, आता तसाच प्रकार गडचिरोलीमध्ये सागवान तस्करांनी केल्याचं समोर आलं आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
1/6
चोर चोरी करण्यासाठी काय काय शक्कल लढवू शकतो, याचा नेम नाही. आता अशीच एक चोरीची भन्नाट घटना समोर आली आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा सिनेमानं अख्ख्या भारताला वेड लावलं होतं. पुष्पाभाऊ ज्या प्रकार चंदनाची चोरी करण्यासाठी डोक लावत होता, आता तसाच प्रकार गडचिरोलीमध्ये सागवान तस्करांनी केल्याचं समोर आलं आहे.

advertisement
2/6
 गडचिरोली जिल्ह्यात पुष्पा सिनेमा स्टाईलने सागवान तस्करी करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. यात वन विभागाचा कर्मचारी सहभागी असल्याचंही समोर आलं आहे. आता तस्कारांच्या सोबत वनविभागाचा कर्मचारी सामील असल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

3/6
 या सागवान तस्करांनी एका ट्रकच्या ट्रॉलीमध्ये पत्र्याचा वापर केला. ट्रॉलीमध्ये पत्र्याचं एक कॅबिन बनवलं होतं. पत्रा असा लावला होता की, ट्रॉलीमध्ये काहीच साहित्य नाही असं वाटत होतं. पण, पत्र्याचे केबिन बंद करण्यासाठी सगळीकडे आतामध्ये नट लावले होते. ते उघडल्यावर आतमध्ये सागवान असल्याचं आढळून आलं.

4/6
सिरोंचा तालुक्यातून सागवानाच्या लाकडाची तेलंगणा तस्करी करण्यासाठी तस्करांनी  अनोखी शक्कल लढवून वाहनातून तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंतरराज्य वन नाक्यावर झालेल्या तपासणीत हे सागवानाची लाकूड आढळून आलं.

5/6
या सागवान तस्करीची वन विभागाने चौकशी सुरू केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने यात वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती दिली.

6/6
ही बाब समोर आल्यानंतर या वन कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू झाल्याने यात अनेकांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement