advertisement

Nashik Tourist Hidden Places: नाशिककर एकदा तरी थंडीत 'या' हिडेन प्लेसेसला भेट द्या, अजिबात मिस करू नका...

Last Updated:
नाशिक म्हटलं की, आपल्या नजरेसमोर येतात ते पटकन तेथील सर्वच धार्मिक स्थळे. खरंतर नाशिक जिल्हा फक्त धार्मिक स्थळांमुळे नाही तर, तिथल्या मनमोहक निसर्गामुळे सुद्धा आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या, डोळे दिपवून टाकणाऱ्या दऱ्या आणि भव्य दिव्य धरण यामुळे नाशिक जिल्हा अधिकच फेमस आहे.
1/8

2/8
 दररोजच्याच धावपळीतल्या एका दिवसाचा ब्रेक घेऊन कुटुंब आणि मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी ही ठिकाणे उत्तम आहेत. नाशिक शहरापासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या सर्वोत्तम ठिकाणांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. अशा अनेक हिडेन प्लेसेस आहेत की, ज्या अनेकांना माहिती नाहीत.

3/8
 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गरम्य डोंगर आणि हिरवीगार वनराई यासाठीही प्रसिद्ध आहे. येथील ब्रह्मगिरी पर्वताची भव्यता आणि आजूबाजूचे शांत वातावरण मन मोहून टाकते. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.

4/8
 नाशिक जिल्ह्याच्या वणीजवळ असलेले सप्तशृंगी गड हे देवीचे पवित्र स्थान आहे. हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. मंदिरासोबतच, गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण दऱ्यांचे आणि घाटांचे विहंगम दृश्य दिसते. येथील हवामान बहुतेक वेळा थंड आणि आल्हाददायक असते. रोप-वे असल्याने लहान मुलांसाठी हा प्रवास मनोरंजक ठरतो. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 65 किमी. अंतरावर आहे.

5/8
 सोमेश्वर धबधबा नाशिक शहरात असून हा धबधबा शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत दूधसागर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एकाच वेळेला निसर्गाचेही आणि देवाचेही दर्शन घेऊ शकाल. असे विहंगम दृश्य तुम्हाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील आधीच्या दिवसांतच पाहायला मिळेल.

6/8
 पांडव लेणी पुरातन कलेचा अद्भुत असा नमुना आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे चित्रे कोरली आहेत. पाथर्डी गावच्या फाट्यापासून काहीच अंतरावर ही लेणी एका डोंगरावर कोरली आहे. साधारण 2 तासात तुम्ही या लेणीचे संपूर्ण चित्र पाहून पुढचा प्रवास करू शकणार आहात. या ठिकाणी तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅण्डवरून रिक्षाने सहज जाऊ शकणार आहात.

7/8
 नाशिकला भारताची 'वाइन कॅपिटल' म्हणून ओळखले जाते आणि 'सुला विनयार्ड्स' हे त्याचे केंद्र आहे. हे ठिकाण पिकनिकपेक्षा युनिक अनुभवासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही वाइन टेस्टिंग करू शकता, द्राक्षांच्या मळ्यांमध्ये फेरफटका मारू शकता आणि इटालियन-शैलीतील रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 13 किमी अंतरावर आहे.

8/8
 मुंबईहून नाशिककडे जाताना मध्ये इगतपुरी हे सुंदर थंड हवेचे ठिकाण मिळतं. इगतपुरीजवळील भावली धरण परिसर पिकनिकसाठी अतिशय शांत आणि आल्हाददायक आहे. धरणाचे पाणी आणि आजूबाजूचे डोंगर फोटोशूटसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. येथून विपश्यना केंद्र देखील जवळ आहे. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 45 किमी. अंतरावर आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement