गृहिणी क्रेडिट कार्ड अप्लाय करु शकतात का? बँकेचे नियम घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही बिजनेस किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड अगदी सहज मिळते. अनेक वेळा बँका स्वतः तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर करतात. पण गृहिणीला उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत ती क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकते का? जाणून घ्या या प्रकरणी बँकेचा काय नियम आहे.
advertisement
ॲडॉन क्रेडिट कार्ड आणि सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड म्हणजे काय? : ॲडऑन क्रेडिट कार्ड जोडीदाराच्या प्राथमिक क्रेडिट कार्डशी जोडले जाईल आणि त्याची लिमिट देखील प्रायमरी क्रेडिट कार्डनुसार असेल. हे प्रायमरी क्रेडिट कार्डच्या बराबर देखील असू शकते. तर सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डसाठी गृहिणीच्या नावाने बँकेत एफडी असणे आवश्यक आहे. सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डची लिमिट देखील त्यांच्या एफडी रकमेवर अवलंबून असते.
advertisement
गृहिणींना क्रेडिट कार्डचे फायदे कसे मिळतील? : या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गृहिणींना घरच्या खर्चात मोठी बचत करता येईल. या कार्डांद्वारे, महिला किराणा आणि जेवणाच्या खर्चावरील रिवॉर्ड पॉइंट्स, फ्यूल सरचार्जवर सूटचा लाभ घेऊ शकते. तसंच स्पेशल गिफ्ट्स आणि ऑफरसाठी या रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता करू शकतात. याशिवाय, ती तिच्या क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून तिचा क्रेडिट स्कोर सुधारू शकते.
advertisement
अटी काय आहेत? : क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, गृहिणीचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तिच्या पतीकडे क्रेडिट कार्ड असले पाहिजे, ज्याच्या आधारावर तो ॲड ऑन कार्डसाठी अर्ज करू शकतो. तर सुरक्षित क्रेडिट कार्डसाठी गृहिणीच्या नावावर बँकेत Fixed Deposit असावी. एफडीच्या आधारे ती सुरक्षित कार्डसाठी अर्ज करू शकते.
advertisement
advertisement








