Credit Card New Rule : Credit Card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी,1 सप्टेंबरपासून बदलणार नियम

Last Updated:
Credit Card Rule Change : साधारणपणे मार्केटमध्ये क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल सांगितलं जातं; पण क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यावर कोणते चार्जेस आकारले जातील याबाबत कोणीही सांगत नाही.
1/8
येत्या 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँक युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करणार आहे. आता या ट्रान्झॅक्शन्सवर ग्राहक दरमहा फक्त दोन हजार पॉइंट्स मिळवू शकतात. विशिष्ट खर्चाच्या श्रेणींमध्ये रिवॉर्ड जमा होण्याच्या प्रक्रियेचं नियमन करणं, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

advertisement
2/8
टेलिकॉम आणि केबल रिवॉर्ड्सवर मर्यादा : 1 सप्टेंबरपासून टेलिकॉम आणि केबल ट्रान्झॅक्शन्सवर दरमहा दोन हजार पॉइंट्सची मर्यादा असेल. हे ट्रान्झॅक्शन विशिष्ट व्यापारी श्रेणी कोड (एसीसी) अंतर्गत ट्रॅक केले जातात. या मर्यादेमुळे विविध खर्च श्रेणींमध्ये क्रेडिट कार्डचा योग्य वापर सुनिश्चित होईल.

3/8
थर्ड-पार्टी एज्युकेशन पेमेंटसाठी कोणतंही रिवॉर्ड नसणार : थर्ड-पार्टी अ‍ॅप्सद्वारे शैक्षणिक पेमेंटसाठी एचडीएफसी बँक यापुढे रिवॉर्ड पॉइंट देणार नाही. 1 सप्टेंबरपासून लागू होणारा हा बदल अधिकृत चॅनेलद्वारे थेट पेमेंटला प्रोत्साहन देतो. एलिजिबल ट्रान्झॅक्शन शैक्षणिक संस्थेच्या वेबसाइट किंवा पीओएस मशीनद्वारे केले गेलं पाहिजे.

4/8
आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल : आयडीएफसी फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे. पेमेंटची देय तारीखदेखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाईल. कार्डधारकांना आर्थिक शिस्त लावणं, हा या बदलांचा उद्देश आहे.

5/8
यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड : 1 सप्टेंबर 2024 पासून, यूपीआय आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांइतकेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

6/8
त्यामध्ये कोणताही फरक नसेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बँकांना रिवॉर्ड पॉइंट्स आणि RuPay क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये समानता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

7/8
देशात क्रेडिट कार्ड वापराचा ट्रेंड वाढत आहे. अनेकदा आपल्याला बँकेतून किंवा क्रेडिट कार्ड कंपनीतून मोफत कार्डच्या ऑफरबद्दल फोनही येतात. त्यापैकी काही जण खरी माहिती देतात. काही एजंट आणि बँक ग्राहकांना संपूर्ण माहिती न देता क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न करतात.

8/8
साधारणपणे मार्केटमध्ये क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल सांगितलं जातं; पण क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यावर कोणते चार्जेस आकारले जातील याबाबत कोणीही सांगत नाही. क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँका वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली युझर्सकडून पैसे घेतात. एक ग्राहक म्हणून तुम्हाला याबाबत माहिती असणं महत्त्वाचं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement