advertisement

Government Scheme Women : महिलांसाठी सरकारच्या चार स्कीम; स्वत:च्या हिंमतीवर सुरू करा बिजनेस!

Last Updated:
अनेक वेळा महिला आर्थिक कारणांमुळे त्या लघू किंवा मध्यम उद्योग सुरू करू शकत नाहीत. सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. काही योजना राज्य सरकार तर काही केंद्र सरकार चालवतं. या योजना महिलांसाठी खूप मदतीच्या ठरतात.
1/4
सरकारची स्टँड अप इंडिया योजना फक्त महिलांसाठीच नाही तर एससी आणि एसटी कॅटेगरीतल्या व्यक्तींसाठीही फायद्याची आहे. तुम्ही पहिल्यांदाच बिझनेस सुरू करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. तुम्ही यापूर्वी कोणत्याही बँकेचं लोन चुकवलेलं नसावं, ही अट आहे. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस, कृषी संबंधित व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं. या कॅटेगरीत कर्जासाठी लागू असलेल्या बँकेचा सर्वांत कमी दर तुम्हाला दिलेल्या कर्जावर लागू होईल.

2/4
तुम्ही साबण आणि डिटर्जंट व्यवसाय, डेअरी, कपडे उत्पादन व्यवसाय, पापड बनवणं, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स किंवा ब्युटी पार्लर बिझनेससाठी कर्ज घेऊ शकता. त्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी स्त्री शक्ती योजना आहे. याद्वारे महिलांना त्यांच्या बिझनेससाठी मदत दिली जाते. या कर्जासाठी अर्ज करणारी महिला त्या व्यवसायात 50 टक्के किंवा त्याहून अधिक भागीदार असावी, अशी अट आहे. 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी गॅरंटी देण्याची गरज नाही. परंतु पाच ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी बँकेला काही तरी गॅरंटी द्यावी लागते.

3/4
ज्या महिला आधीच सूक्ष्म, लघु किंवा मध्यमस्तरीय व्यवसाय करतायत, त्यांच्यासाठी सिडबी (SIDBI) व एमएसएमईच्या (MSME) माध्यमातून क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टची स्थापना केली आहे. त्यांचं काम महिलांना कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत करणं आहे. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) नावाचा हा ट्रस्ट महिलांना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतो. ही रक्कम आता पाच कोटी रुपये करण्यात आली आहे.

4/4
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) सुरू करण्यात आलेली मुद्रा लोन योजना महिला उद्योजकांनाही कर्ज देते. याअंतर्गत 10 लाख रुपयांचं कर्ज दिलं जातं. या कॅटेगरी अंतर्गत, शिशु योजनेअंतर्गत काम सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयांचे कर्ज, किशोर आणि तरुण योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत आणि जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. महिला उद्योजकांसाठी व्याजदरात सवलत दिली जाते. हे कोलॅटरल-फ्री लोन असतं आणि त्याचा कालावधी पाच वर्षं असतो. याअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांना लोन दिलं जातं.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement