Indian Railway : चालत्या ट्रेनमधून मोबाईल खाली पडला? घाबरु नका तो परत मिळेल, फक्त 'या' गोष्टी करा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चालत्या ट्रेनमधून मोबाईल खाली पडला, असं समजून बहुतेक लोक घाबरतात, पण शांत राहून योग्य पावलं उचलली, तर तुमचा मोबाईल परत मिळवणं पूर्णपणे शक्य आहे.
भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. लांबचा प्रवास असो वा रोजचं ऑफिसचं अंतर ट्रेनने जाणं हे सोपं, स्वस्त आणि आरामदायी पर्याय मानलं जातं. रेल्वेचं जाळं भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विस्तारलेलं आहे. त्यामुळे शहरं, गावं आणि राज्यं यांना जोडणारा हा वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. पण या प्रवासादरम्यान कधी कधी एखादी छोटीशी चूक मोठं संकट बनते.
advertisement
advertisement
घाबरू नका आणि ट्रेनची चेन ओढू नकामोबाईल खाली पडल्याचं लक्षात आलं की लोक लगेच गोंधळतात आणि काही वेळा ट्रेन थांबवण्यासाठी चेन ओढतात. पण लक्षात ठेवा ट्रेनची चेन ओढणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यासाठी 5000 रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे घाबरू नका, स्वतःला शांत ठेवा आणि पुढची पावलं समजून उचला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


