Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात हिम लाट, या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील बहुतांश भागात सध्या शीतलहरीची स्थिती असून पारा अनेक ठिकाणी 10 अंशांच्या खाली गेला आहे. दिवसभर गारवा जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील बहुतांश भागात सध्या शीतलहरीची स्थिती असून पारा अनेक ठिकाणी 10 अंशांच्या खाली गेला आहे. दिवसभर गारवा जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरणे, लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे तसेच धुक्याच्या काळात वाहन चालवताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कसे असेल याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळच्या वेळेत दाट धुक्याची शक्यता असून हवामान कोरडे राहणार आहे. थंडीचा जोर काहीसा कमी असला तरी गारवा जाणवेल. मुंबईत किमान तापमान सुमारे 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवरही अशीच स्थिती राहणार असून सकाळी धुके आणि दुपारी कोरडे हवामान अनुभवायला मिळेल.
advertisement
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मात्र थंडीची लाट स्पष्टपणे जाणवत आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून सकाळच्या वेळेत गारठा अधिक तीव्र आहे. आजही या भागांत बर्फासारखी थंडी जाणवण्याची शक्यता असून सकाळी दाट धुके राहील. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव आणखी वाढत असून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत शीतलहरीची स्थिती असून किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी गारठा अधिक तीव्र जाणवणार असून थंडीचा त्रास वाढू शकतो.
advertisement









