बीडच्या तरुणीची कमाल, टाकाऊ कोषापासून बनवला टिकावू रेशीम हार, राज्यात मोठी मागणी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बीडमधील प्रियंका शिवराज फाटे यांनी 2023 मध्ये पहिल्यांदा टाकाऊ कोषापासून हार तयार केला. त्यातून आता त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
advertisement
ज्यातून शेतीत होणारे नुकसानही टाळता येते आणि त्यापासून चांगले उत्पन्न सुद्धा मिळवता येते. या प्रयोगात आतापर्यंत अमरावती, सातारा, कोल्हापूर आणि बीडचे शेतकरी यशस्वी झाले आहेत. बीडमधील प्रियंका शिवराज फाटे यांनी 2023 मध्ये पहिल्यांदा टाकाऊ कोषापासून हार तयार केला. त्यातून आता त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
advertisement
प्रियंका फाटे(पवार) यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा त्या सांगतात की, माझ्या वडिलांची बीडमधील माजलगाव तालुक्यात टकारवाडी या गावात 3 एकर शेती आहे. त्यात आम्ही पारंपरिक पिकं न घेता रेशीम उत्पादन गेल्या 14 वर्षांपासून घेत आहोत. रेशीम उत्पादन घेऊन आमचं सर्व सुरळीत चालू होत. त्यातून आम्हाला 7 ते 9 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत होते. अशातच 2022 मध्ये आमच्या रेशिमचा एक स्लॉट पूर्ण बेकार झाला होता. तापमान किंवा इतर काही कारणामुळे रेशीम किडा पूर्ण खराब होऊन आमचे नुकसान झाले होते.
advertisement
अशी सुचली कल्पना? बेकार झालेल्या रेशीम मधून निघालेला कोष हा कमी दर्जाचा होता. मग याच करायचं काय? याबाबत आमचे कुटुंब चर्चा करत होते. हा कोष विक्री केला तर किती पैसे मिळणार? पुढे काय करायचं? हे सर्व सुरू असताना मी त्या कोषाला ब्लेडच्या साहाय्याने डिवचत बसले होते. कट मारत असताना त्यातून वेगवेगळे आकार तयार होऊ लागले. तेव्हा मला कल्पना सुचली की, यापासून छान बुके आणि हार निर्मिती आपण करू शकतो. तेव्हा पहिला हार मी 2023 मध्ये बनवला. त्यानंतर हार, बुके, किचन, फोटो फ्रेम आणि इतर बऱ्याच शोभेच्या वस्तू मी बनवल्या आहेत, असेही प्रियंका सांगतात.
advertisement
advertisement
हाराची किंमत किती? या हाराची किंमत 1500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत आहे. हाराचा आकार आणि डिझाईन पाहून त्याची किंमत ठरवली जाते. 5 हजार रुपयांपर्यंत सुद्धा रेशीम हार मिळू शकतो. आतापर्यंत या हाराची विक्री पुणे, मुंबई, सोलापूर, बीड आणि बऱ्याच ठिकाणी केली आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यापर्यंत सुद्धा आमचे हार पोहचले आहेत. यासाठी मला पूरक उद्योग युवा महिला कृषी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, असे प्रियंका सांगतात.
advertisement
पुढील नियोजन काय? पुढे मला सर्व रेशीम शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे. कारण एखादा स्लॉट खराब झाला की शेतकरी कासावीस होतो आणि नुकसानही सहन करावे लागते. त्यांना मला एकच सांगायचं आहे की, निराश न होता त्यातून मार्ग काढून आपण उत्पन्नात वाढ करू शकतो. यासाठी मला पुढे शेतकऱ्यासोबत काम करायचं आहे, असे प्रियंका सांगतात.









