Share Market: 5 शेअर्स म्हणजे 'लंबी रेस का घोडा', Long-Term साठी मिळवून देतील दुप्पट नफा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मेटल शेअर्स खरेदी करावेत असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. क्रूड ऑईल, पेट्रोल कंपन्यांचे शेअर्स थोडे तेजीत असल्याचं दिसत आहे. निफ्टी मेटल सध्या पॉझिटिव्ह आहेत. ते विकायची गडबड करू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मुंबई : इस्रायल-इराण संघर्ष, सेबीचे बदलेले नियम याचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. गुरुवारी सकाळी प्री ओपनिंग आणि पहिल्या सत्रात सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलं आहे. निफ्टी देखील 25,400 वर आहे. शेअर मार्केटमध्ये सध्या अस्थिरता आहे. त्यामुळे नक्की काय करावं ते सुचत नाही. गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
या पाच कंपन्या गुंतवणूकदारांना येत्या काळात 26 टक्के रिटर्न देतील असा विश्वास मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला आहे. JSPLचं टार्गेट 1200, HDFC Life चं टार्गेट 900, L&T Finance चं टार्गेट 230 लावण्यात आलं आहे. 22 टक्के भाव अपसाइड दिसण्याची शक्यता आहे. cole india चं टार्गेट 600, Persistent चं टार्गेट 6300 देण्यात आलं आहे.
advertisement
अनुज सिंघल म्हणाले, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी जर शेअर्स खरेदी केले तर त्यांना लाँग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो. मागच्या 40-50 वर्षांतला इतिहास काढून पाहावा, जिओ पॉलिटिकल इम्पॅक्टमुळे जेव्हा शेअर मार्केट खाली येतं तेव्हा तुम्ही गुंतवणुकीवर भर द्यायला हवा. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा. पॅनिक होऊन तुमच्या हातातले स्टॉक्स विकू नका.
advertisement
advertisement