Money : फाटलेल्या नोटांचं RBI काय करते? भारतीय Currency ची सिक्रेट प्रोसस ऐकून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या नोटांचा योग्य निपटारा करणे हे केवळ अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेसाठीही खूप महत्त्वाचे असते. चला तर मग, या 'खराब' नोटांचा बँक ते विनाशापर्यंतचा प्रवास कसा असतो, ते टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया.
प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खिशापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक नोटेची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ची असते. नोटांची छपाई, त्यांचे वितरण आणि जुन्या, खराब नोटा चलनातून काढून टाकण्याचे काम पूर्णपणे RBI च्या देखरेखीखाली चालते. परंतु, तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का, की दरवर्षी बँकिंग सिस्टीममध्ये परत येणाऱ्या कोट्यवधी फाटलेल्या, जळालेल्या किंवा खूप जुन्या झालेल्या नोटांचं नेमकं काय होतं?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2. RBI कलेक्शन सेंटरमध्ये तपासणीदेशभरात RBI चे एकूण 19 इश्यू ऑफिस आणि कलेक्शन सेंटर्स आहेत. येथे या नोटांची तपासणी करण्यासाठी विशेष मशीनचा वापर केला जातो. जो नोट चांगल्या स्थितीत आहेत, त्यांना पुन्हा चलनात पाठवले जाते. जे नोट 50 % पेक्षा जास्त खराब झाले आहेत, त्यांना नष्ट करण्याच्या प्रक्रियेत टाकले जाते.
advertisement
3. नोटा नष्ट करण्याची प्रक्रियाखराब झालेल्या नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असते. सर्वप्रथम या नोटा मोठ्या श्रेडर मशीनमध्ये टाकून त्यांचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यांना नंतर इन्सिनेरेटर मशीनमध्ये उच्च तापमानावर जाळले जाते. जळाल्यानंतर जी राख उरते, त्याची पर्यावरणाचे नियम पाळून लँडफिलमध्ये सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते.
advertisement
कायदेशीर नियम आणि फायदेनोटा नष्ट करण्याचा अधिकार फक्त RBI लाच आहे. सामान्य नागरिकांनी नोट जाळणे किंवा स्वतःहून नष्ट करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. जुन्या नोटा चलनातून बाहेर काढल्यामुळे बाजारात नेहमी स्वच्छ आणि नवीन नोटांचे सर्कुलेशन राहते. तसेच, यामुळे बनावट नोटांवर (Fake Notes) नियंत्रण ठेवणे सोपे होते आणि देवाणघेवाण अधिक सुरक्षित होते.
advertisement
advertisement
advertisement


