advertisement

'अर्जुनच्या लग्नाला यायचं...', सचिन तेंडुलकर पत्रिका घेऊन सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला!

Last Updated:

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी सचिन त्याच्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेला होता.

'अर्जुनच्या लग्नाला यायचं...', सचिन तेंडुलकर पत्रिका घेऊन सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला!
'अर्जुनच्या लग्नाला यायचं...', सचिन तेंडुलकर पत्रिका घेऊन सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला!
नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी सचिन त्याच्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेला होता. अर्जुन तेंडुलकरचं लग्न सानिया चांडोकसोबत होणार आहे. लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी सचिनसोबत त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होता. याशिवाय सानिया चांडोक आणि तिच्या घरच्यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो टाकले आहेत.
'अर्जुन आणि सानियाच्या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं. मोदीजींनी तरुण जोडप्याला आशिर्वाद दिले आणि काही महत्त्वाचे सल्ले दिले, त्याबद्दल धन्यवाद', असं सचिन त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
advertisement

कधी आहे अर्जुन-सानियाचं लग्न?

ऑगस्ट 2025 मध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर आता 3 मार्च रोजी लग्नाचे विधी सुरू होणार असून 5 मार्चला मुख्य समारंभ होईल, असं सांगण्यात येत आहे. हा सोहळा मुंबईत होणार आहे, तसंच खाजगी कार्यक्रम असल्यामुळे फक्त कुटुंब, जवळचे मित्र आणि क्रिकेट जगतातील काही निवडक सदस्य उपस्थित राहतील, असं वृत्त आहे. सानिया चांडोक ही मुंबईमधील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे.
advertisement

आयपीएल आधी लग्न

आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायच्या आधी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचं लग्न होणार आहे. अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणार आहे. आयपीएल पदार्पणापासूनच अर्जुन मुंबईच्या टीममध्ये होता, पण यंदाच्या मोसमाआधी मुंबईने अर्जुनला लखनऊसोबत ट्रेड केलं. अर्जुनने त्याच्या देशांतर्गत क्रिकेटची सुरूवातही मुंबईकडून केली, पण नव्या संधीच्या शोधात अर्जुन गोव्याच्या टीममध्ये गेला आणि 2022 साली त्याने गोव्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'अर्जुनच्या लग्नाला यायचं...', सचिन तेंडुलकर पत्रिका घेऊन सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement