Mumbai Rain: मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Weather: गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
जून महिना सुरू होताच राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेले 4 दिवस पाऊस सातत्याने पडतोय. तसंच आज आज, 17 जून रोजी मुंबई, पालघर, नवी मुंबई, ठाणे परिसरात आज हवापालट होणार असून तुरळक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/5
मुंबई शहरात सकाळपासून आकाश ढगाळ असून, सकाळी हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. सायंकाळी व रात्री काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमान साधारण 30 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे दमट वातावरण जाणवेल.

3/5
नवी मुंबई व ठाणे परिसरात पावसाच्या सरी सकाळी तुरळक असतील, पण दुपारनंतर व विशेषतः सायंकाळी जोरदार पावसाचा धोका आहे. नवी मुंबईतील वाशी, घणसोली, बेलापूर परिसर तसेच ठाणे शहर व कळवा, मुंब्रा परिसरांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असून, वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी उघड्यावर जाणे टाळावे.

4/5
पालघर जिल्ह्यात सकाळीच पावसाने हजेरी लावली असून, येथे विशेषतः दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीलगतच्या भागांत वाऱ्याचा वेग तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्याविषयी सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तापमान 29 ते 33 अंशांच्या दरम्यान राहील, आणि सतत पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

5/5
कोकण विभागात, विशेषतः रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मान्सूनने जोर धरला असून, रात्रीपासून सुरू असलेला पाऊस दिवसभरात अनेक भागांत मुसळधार स्वरूपात होण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला असून, नद्या व नाले भरून वाहू शकतात. हवामान विभागाने स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement