advertisement

Mumbai MHADA : मुहूर्त हुकला! म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली; पाहा काय आहे कारण?

Last Updated:
MHADA Official Website Registration Problem : लॉटरी शिवाय घर घेण्याची संधी म्हाडाकडून देण्यात आली होती. मात्र आता या प्रक्रियेत काहीसा बदल झालेल आहे.
1/7
 म्हाडा घराच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया तूर्तास लांबणीवर पडली आहे. त्यामुळे हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या खरेदीदारांचा हिरमोड झाला असून आता अर्जासाठी नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

2/7
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत विविध वसाहतींमधील 120 सदनिकांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार होती.

3/7
 मात्र आता या प्रक्रियेसाठी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणी तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

4/7
म्हाडाने याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक अर्जदारांना मोठी संधी उपलब्ध करून दिली होती. जाहिरातीत 5 फेब्रुवारीपासून माहिती पुस्तिका उपलब्ध होईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते.

5/7
मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे ही माहिती पुस्तिका ठरलेल्या दिवशी उपलब्ध होणार नसल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले आहे.

6/7
जाहिरात प्रसिद्ध होताच मुंबई आणि परिसरातील अनेक नागरिकांनी या घरांसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी म्हाडा कार्यालयांशी तसेच अधिकृत संकेतस्थळावर चौकशी सुरू केली होती.

7/7
दरम्यान अर्ज नोंदणी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार तसेच माहिती पुस्तिका कधी उपलब्ध होईल याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement