Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 ऑगस्टला या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Last Updated:
Water Cut in Mumbai : एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
1/7
मुंबईकरांनो आज-उद्या पाणी जपून वापरा, याचं कारण म्हणजे मुंबईतील काही भागांमध्ये उद्या पाणी बंद राहणार आहे. कामानिमित्ताने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा असं आवाहन BMC ने केलं आहे.

advertisement
2/7
महानगरपालिकेतर्फे एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. संबंधित कामे शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात येणार आहेत.

3/7
एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग या भागातील पाणीपुरवठा बंद राहील.

4/7
खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भागातला पाणीपुरवठा बंद राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेचा काही भागातील पाणीपुरवठा बंद राहील.

5/7
नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. जलवाहिनी दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिकेनं ट्विट करुन नागरिकांना दिली आहे.

6/7
पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

7/7
जुन्या जलवाहिनीचं काम करण्यासाठी तर नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचं काम करण्यासाठी पाणीपुरवठा 30 ऑगस्टरोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. योग्य तो पाणीसाठा करुन ठेवावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement