Mumbai Rain: सावधान! मुंबईसह कोकणात पावसाचं तुफान, 48 तासांसाठी हायअलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात आज मान्सून धुमाकूळ घालणार आहे. पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरलेला असून, आज 25 जुलै रोजीही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आणि कोकणातील सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरीला आज रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.

advertisement
2/5
मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पावसामुळे खड्डे, पाणथळ रस्ते आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत तापमान 24 अंश ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील

3/5
ठाणे, नवी मुंबईत पावसाने जोर धरल्यास मध्य रेल्वेवर मोठा परिणाम होतो. दोन दिवसापासून पावसाची तीव्रता कायम असून आजही या भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. सततच्या पावसामुळे नाले आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

4/5
 कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नद्या, ओढे आणि डोंगराळ भागांत भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

5/5
गेली सलग 3 ते 4 दिवस पालघरला पावसाने झोडपून काढलं होतं. आज देखील पावसाचा जोर कायम राहणरा आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement