22 तास नोटा मोजून फुटला घाम, हात थकले तरी कॅश संपेना, देशातील सर्वात मोठी रेड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राजेश मिश्रा यांच्या मानिकपूर घरात पोलिसांनी छापा टाकून २ कोटींच्या १०, २०, ५०, १०० नोटा, ६ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मैक जप्त केले, कुटुंबही तस्करीत सामील.
advertisement
advertisement
पोलीस आणि तपास पथकाने गांजा तस्कर राजेश मिश्रा याच्या घरात सापडलेल्या नोटा मोजायला सुरुवात केली. पण काही वेळातच पोलीस कर्मचारी, विशेषतः महिला पोलीस, नोटा मोजून थकून गेल्या. पैशांचा ढीग इतका मोठा होता की, कर्मचाऱ्यांना वारंवार ब्रेक घ्यावा लागला आणि घाम पुसावा लागला. पैशांचा ढिग काही संपायचा नाही, ते पाहून पोलीसही चक्रावले.
advertisement
advertisement
हा तपास इतका सोपा नव्हता. सीओ यांच्या नेतृत्वाखालील ४ पोलीस पथके तस्कर राजेश मिश्रा याच्या मानिकपूर येथील घरी पोहोचली. सराईत गुन्हेगार असलेल्या राजेशवर गांजा, तस्करीसह १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि सध्या तो तुरुंगात आहे. २२ पोलीस कर्मचाऱ्यांनी ४ गाड्यांमधून येऊन तब्बल २४ तास घराची कसून तपासणी केली.
advertisement
advertisement
या गुन्हेगारी नेटवर्कचा सर्वात धक्कादायक खुलासा हा आहे की, राजेश मिश्राचे संपूर्ण कुटुंब या नशेच्या धंद्यात सामील आहे. राजेश जेलमधूनच त्याची पत्नी रीना मिश्रा हिच्या माध्यमातून हा सारा अवैध धंदा चालवत होता. पत्नी रीना पतीच्या आदेशानुसार गावात आणि आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांचा व्यवसाय पसरवत होती.


