advertisement

पंतप्रधान मोदींचा फक्त एक सल्ला अन् जणू चमत्कारच घडला! मुलीने गमावलेली दृष्टी परत आली

Last Updated:
PM Modi Advice Brought Back Girl Eyesight : मुलीच्या वडिलांनी तिला बड्या बड्या डॉक्टरांकडे नेलं पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी नरेंद्र मोदींच्या एका सल्ल्याने मुलीला दृष्टी मिळाली.
1/5
डोळे शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा अवयव ज्याने आपण पाहतो. पण तितकाच तो नाजूकही आहे. बऱ्याचदा दृष्टी गेली की परत येत नाही. अशीच एक मुलगी जिने आपली दृष्टी गमावली, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी बरेच बडे बडे डॉक्टर केले पण काही फायदा झाला नाही शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना एक सल्ला दिला. तो फॉलो केला आणि या मुलीची दृष्टी परत आली आहे.

2/5
ही स्टोरी आहे केनियाच्या माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांची मुलगी रोझमेरीची. रोझमेरीला गंभीर ब्रेन ट्यूमर असल्याचं निदान झालं. केनियाचे पंतप्रधान असताना तिच्या वडिलांनी जगातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार करण्याची व्यवस्था केली. शस्त्रक्रियेनंतर ब्रेन ट्यूमर बरा झाला, पण रोझमेरीला तिची दृष्टी गमावून त्याची किंमत मोजावी लागली. जवळजवळ 4 वर्षे त्यांनी जगभरातील नामांकित रुग्णालये आणि डॉक्टरांकडे धाव घेतली, पण तिची दृष्टी काही परत आली नाही.

3/5
2016 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भेटीदरम्यान रैला ओडिंगा यांना भेटले. रोझमेरीच्या प्रकृतीबद्दल कळताच मोदींनी त्यांना केरळमधील एका आयुर्वेदिक नेत्र रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला रोझमेरीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

4/5
एर्नाकुलम येथील श्रीधारीयम आयुर्वेदिक आय हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये रोझमेरीने आयुर्वेदिक उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या मते मेंदूतील धमनीविकार आणि ऑप्टिक नर्व्हच्या शोषामुळे तिची दृष्टी गेली होती. तिच्यावर तीन आठवड्यांच्या दोन सत्रांमध्ये उपचार करण्यात आले. आयुर्वेदिक औषधे पारंपारिक उपचारांसह एकत्रित केली गेली.

5/5
मीडिया रिपोर्टनुसार रोझमेरीवर उपचार करणारे मुख्य चिकित्सक डॉ. नारायणन नंबूथिरी म्हणाले, जेव्हा ती पहिल्यांदा रुग्णालयात आली तेव्हा तिला स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त हलका प्रकाश जाणवत होता. पहिल्या सत्रानंतर उपचारांचे परिणाम दिसू लागले आणि आता उपचार पूर्ण झाल्यानंतर रोझमेरी स्पष्टपणे पाहू शकते.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement