Monsoon Diet: पावसाळ्यात सतत आजारी पडताय? लगेच करा आहारात बदल

Last Updated:
Monsoon Diet: सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे वातावरण थंड होऊन वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. बदल्यात वातावरणामुळे पावसाळ्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात आरोग्याचा समस्यांपासून दूर राहायचे असेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.
1/5
पावसाळ्यात वातावरणातील गारवा वाढलेला असतो. अशा वातावरणात गरमागरम आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तळलेले पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही विविध भाज्यांचे सूप पिऊ शकता. सूप प्यायल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते आणि शरिराला भाज्यांतील पोषक घटक देखील मिळतात.

advertisement
2/5
पावसाळ्यात ग्रीन टी, हर्बल टी म्हणजेच तुळशी, आले, दालचिनी आणि हळद ह्या गोष्टींचा काढा फायदेशीर ठरतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बॅक्टेरियाविरोधी आणि दाहविरोधी घटक मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय यामुळे पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर हायड्रेट राहण्यास देखील मोठी मदत होते.

3/5
पावसाळ्यात प्रोबायोटिक अन्नाचं सेवन केले पाहिजे. यात दही, ताक, लोणी या पदार्थांचा समावेश होतो. पावसाळ्यात आहारात पुरेशी प्रथिनं असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारातून लवकर बरं होण्यास मदत होते. याशिवाय दुध, दुग्धजन्य पदार्थ, छोले, मसूर, राजमा, चिकन आणि अंडी हे पदार्थ देखील उपयुक्त ठरतात.

4/5
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक कमी झालेली असते. त्यामुळे आपण पटकन आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी लिंबूवर्गीय फळे खूप महत्वाची आहे. संत्री, पपई, लिंबू, चेरी, जांभूळ आणि डाळिंब ही फळं खावीत.

5/5
लिंबूवर्गीय फळांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्वं मोठ्या प्रमाणात असतात. सोबतच रोजच्या जेवणात लसूण, आले आणि मेथीची भाजी या भाज्यांचा समावेश करावा. यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. पावसाळ्यात आहाराची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकाल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement