Exercise Benefits: फिट अँड फाईन राहण्याची इच्छा आहे? व्यायामासाठी द्या इतकी मिनिटे
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Exercise Benefits: सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक हालचाली कमी होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, पाठदुखी यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे हे शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही उपयुक्त ठरतं.
advertisement
शरीराची नियमित हालचाल झाल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि हाडांची घनता टिकून राहते. धावणे, सायकलिंग, पोहणे, योगासने किंवा जिममधील व्यायाम या सर्व प्रकारांमुळे शरीराचा मेटाबॉलिझम वेग वाढतो. त्यामुळे शरीराचं वजन नियंत्रणात राहतं. मानसिक आरोग्यावर देखील व्यायामाचा प्रभाव पडतो. नियमित व्यायामामुळे एंडॉर्फिन नावाचं हॅपी हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे ताणतणाव आणि नैराश्य कमी होते.
advertisement
advertisement
योगा आणि प्राणायम यामुळे मन शांत राहते व एकाग्रता वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज सकाळी 15 मिनिटे प्राणायम केल्यास मेंदूचे कार्य सुधारते. अनुलोम, विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायम सहज करता येतात. अभ्यास, नोकरी किंवा घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांसाठी हा मानसिक ताजेपणा फार महत्त्वाचा आहे.
advertisement
व्यायाम हा फक्त आजार टाळण्यासाठी नाही तर एकूण जीवनमान सुधारण्यासाठी गरजेचा आहे. दिवसातून फक्त 30 ते 45 मिनिटे व्यायामासाठी दिल्यास दीर्घकाळ निरोगी राहता येते. व्यस्त वेळापत्रकातही व्यायामाला प्राधान्य दिल्यास जीवनात सकारात्मक बदल जाणवतात. त्यामुळे वय, व्यवसाय किंवा परिस्थिती काहीही असो, नियमित व्यायाम केला पाहिजे.