Healthy Life: सततची धावपळ, नैराश्य अन् थकलेलं शरीर, योग आणि ध्यानाने मिळेल सर्व समस्यांवर उपाय

Last Updated:
Healthy Life: सध्याची लाईफस्टाईल प्रचंड धकाधकीची झाली आहे. बहुतांशी लोक काम आणि कौंटुबिक जबाबदारी यामध्ये संतुलन साधण्यासाठी धावपळ करताना दिसतात. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यवर होतो. या पार्श्वभूमीवर योग आणि ध्यानधारणेचं (मेडिटेशन) यांचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं.
1/5
तणावग्रस्त जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवणं, ही मोठी आव्हानात्मक बाब झाली आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून जगभर पसरलेलं योग आणि ध्यान हे सध्या जागतिक स्तरावर आरोग्यदायी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून संपूर्ण शरीराला सुदृढ ठेवणारा एक वैज्ञानिक मार्ग आहे.

advertisement
2/5
नियमित योगाभ्यासामुळे स्नायू आणि हाडे बळकट होतात, शरीर लवचिक राहते तसेच पचनक्रिया आणि श्वसनक्रियेत सुधारणा होते. योगामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. शरीराच्या ऊर्जेवर आणि कार्यक्षमतेवर याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी योगाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं.

3/5
ध्यान ही मनाला स्थिर ठेवण्याची आणि एकाग्रता वाढवण्याची एक प्रभावी पद्धत आहे. सततच्या धावपळीमुळे निर्माण होणारा ताण, चिंता आणि नैराश्य यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय ठरतो. संशोधनानुसार, ध्यान केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक राहतो.

4/5
योग आणि ध्यान या दोन्हींचा एकत्रित सराव केल्याने शरीर आणि मन यांचा संतुलित विकास साधता येतो. शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळतो होतो. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद ध्यानातून मिळते आणि शारीरिक तंदुरुस्ती योगातून मिळते.

5/5
गेल्या काही वर्षांपासून जगभर 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा केला जातो. यावरून योग आणि ध्यानाचे जागतिक महत्त्व स्पष्ट होते. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि विविध संस्थांमध्येही योग व ध्यानाचा समावेश वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज केवळ 30 ते 45 मिनिटे योग व ध्यान केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं आणि जीवनशैली अधिक समृद्ध होते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement