Weather Alert: शनिवारी पावसाचा धुमाकूळ, 11 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान विभागाकडून 24 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून 19 जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केल आहे.
advertisement
कोकण विभागातील पालघर, ठाणे, आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व पुणे घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि पुणे घाटमाथा परिसर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement