Weather Alert : महाराष्ट्रावर बुधवारी कोल्ड वेव्हचं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान अगदी 7 अंश सेल्सिअसपर्यंत निम्न स्तरावर पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पाहुयात 10 डिसेंबरला राज्यातील वातावरण कसे असेल.
advertisement
advertisement
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठा तीव्रतेने वाढणार आहे. पुण्यात तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस एवढी नीचांकी नोंदवले जाईल. तर यापुढील दोन दिवस तापमान केवळ 7 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी वाढत्या थंडीच्या कडाक्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








