Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर मोठं संकट, रेड अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
20 ऑगस्ट रोजीही राज्यातील सर्वच भागांत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
advertisement
advertisement
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे घाटमाथा परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने शेतीचे भरपूर नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाची उघडीप कधी मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 20 ऑगस्ट रोजीही राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.









