Weather Alert: विजा कडाडणार, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज सोलापूर, कोल्हापूरसह 4 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पावसाच्या उघडिपीमुळे कमाल तापमानाचा पारा तिशीपार असून, उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज 18 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोलापूर जिल्हात पावसाची उघडीप कायम असून जिल्ह्यातील कमाल तापमान वाढ होत आहे. मागील 24 तासात 32.4 अंश तापमानाची नोंद सोलापूर मध्ये झाली. पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर राहणार आहे. आज ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने दक्षतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement










