advertisement

Weather Alert : वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, हवामान विभागाकडून राज्याला अलर्ट

Last Updated:
राज्यात 22 मे रोजी पावसाची शक्यता कायम आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
1/7
राज्यात 22 मे रोजी पावसाची शक्यता कायम आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

2/7
मुंबईत ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुण्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून तेथील तापमान 22 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.

3/7
छत्रपती संभाजी नगर, नाशिकमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तेथील कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे.

4/7
नागपूरमध्ये 22 मे रोजी 29 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असू शकतं. त्याठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

5/7
राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्या नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

6/7
त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अधिक तीव्रतेने पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

7/7
त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील वातावरण ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement