advertisement

Diwali Gift: घड्याळच नाही, या 5 वस्तूही कोणाला देऊ नये गिफ्ट, ओढावून घ्याल अडचणी!

Last Updated:
दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदाचा सण. या दिवसांमध्ये सर्वत्र प्रचंड प्रसन्न, सकारात्मक असं वातावरण असतं. दिवाळीआधी सर्व कुटुंबीय मिळून घराची साफसफाई करतात, फराळ बनवतात, मग नातेवाईक एकमेकांना भेटतात आणि एकत्र येऊन हा दिव्यांचा सण उत्साहात साजरा करतात. या काळात एकमेकांना भरपूर मिठाई आणि गिफ्ट्स दिले जातात. परंतु तुम्हाला माहितीये का, कितीही जिवलग व्यक्ती असली तरी काही वस्तू अजिबात भेट म्हणून देऊ नये, नाहीतर आपल्या वाट्याला प्रचंड दु:ख येऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्रातील जाणकार सांगतात. 
1/7
दिवाळीला एकमेकांना गिफ्ट्स देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. परंतु काही वस्तू चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नये. घड्याळ तर अजिबात देऊ नये, मग ते हातातलं असो किंवा भिंतीवरचं असो. जर कोणाला घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं तर आपला वाईट काळ सुरू होऊ शकतो अशी मान्यता आहे. 

2/7
घड्याळाला वेळ सरल्याचं प्रतीक मानतात. आपण इतर कोणालातरी घड्याळ देणं याचा अर्थ आपली वेळ सरणं किंवा संपणं असा होतो. चुकून जरी कोणाला घड्याळ गिफ्ट केलं तर आपली वाईट वेळ सुरू झालीच म्हणून समजायचं. 

3/7
दिवाळीला काळ्या रंगाचे कपडे अजिबात कोणाला गिफ्ट देऊ नये. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक म्हणजे दिवाळी. या काळात संपूर्ण घर, परिसरात रोषणाई केली जाते, दिव्यांचा लखलखाट केला जातो. अशात काळे कपडे वापरणं किंवा कोणाला देणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, काळ्या रंगातून नकारात्मकता पसरते. त्यामुळे घरात निर्माण झालेल्या आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडाही पडू शकतो.

4/7
दिवाळीला कधीच कोणाला नकली वस्तू भेट म्हणून देऊ नये. कात्रीही अजिबात देऊ नये. यामुळे नातेसंबंध बिघडतात, वाद निर्माण होतात. घरात सदैव सुख, शांतीचं वातावरण राहण्यासाठी दिवाळीत कोणालाही नकली वस्तू भेट म्हणून देऊ नये. 

5/7
सोनं आणि चांदी हे कितीही पवित्र धातू असले तरी त्यांचं नाणं गिफ्ट देणं धार्मिकदृष्ट्या अशुभ मानतात. याचा वाईट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो असं म्हणतात. त्यामुळे दिवाळीत आपण स्वत:साठी भरभरून सोनं, चांदी खरेदी करावी, मात्र सोन्याची किंवा चांदीची नाणी कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नये. 

6/7
चप्पल किंवा बूटदेखील दिवाळीत गिफ्ट देणं अशुभ मानलं जातं. यामुळे आपल्या घरातील सुख, शांती भंग होते अशी मान्यता आहे. तसंच घरात आर्थिक चणचणही निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणालाही गिफ्ट देताना अत्यंत काळजीपूर्वक खरेदी करावी. उत्साहात येऊन वर दिलेल्यापैकी कोणतीही वस्तू गिफ्ट दिली तर नकळत आपलं सुख इतरांना देऊन बसाल, त्यामुळे काळजी घ्या. 

7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement