Nag Panchami 2024: नागपंचमीला चुकूनही करू नका ही कामं; अनेक पिढ्यांवर राहील कालसर्प दोषाचं सावट

Last Updated:
Nag Panchami 2024: नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केली जाते. नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष दूर करण्यासाठीही अतिशय शुभ मानला जातो. नागपंचमीचा दिवस खूप खास असतो.
1/10
दर वर्षी श्रावण महिन्यातल्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. या वर्षी नागपंचमी शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.

advertisement
2/10
या दिवशी केलेल्या चुकांचे परिणाम फक्त एका व्यक्तीलाच नाही, तर तिच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी मनाई करण्यात आलेल्या गोष्टी अजिबात करू नका.

3/10
नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीवरची सर्व संकटं दूर होतात. धनलाभाचे योग तयार होतात.

4/10
नागपंचमीच्या दिवशी करू नका ही कामं- नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि नागदेवाला त्रास होईल असं कोणतंच काम करू नये. साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अनेक देवी-देवतांचा सापांशी थेट संबंध आहे. सापांना त्रास देणं खूप महागात पडू शकतं.

5/10
सापाला दूध पाजू नका. साप दूध पीत नाही, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. साप किंवा नाग यांना जबरदस्तीने दूध पाजणं त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू ठरतं. नागपंचमीच्या दिवशी मातीपासून बनवलेल्या नागाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करावा.

6/10
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्यावर आणि कढईत बनवलेलं अन्न खाऊ नये. या दिवशी भात खाणंही वर्ज्य मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी पुरी खाऊ शकता.

7/10
 नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये. तसंच या दिवशी शेतात कोणतीही कामं करू नयेत. पावसाळ्यात साप बाहेर पडतात. त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना त्रास होऊ शकतं. त्यामुळे पाप लागू शकतं, असं म्हणतात.

8/10
सापांचा छळ केल्याने, त्यांना मारल्याने कालसर्प दोष होतो. हा दोष अनेक पिढ्या चालू राहतो. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये.

9/10
नागपंचमीच्या दिवशी सुई, चाकू यासारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये.

10/10
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement