Shani Krupa: शुभ संकेत! शनिवारी दिसल्या या गोष्टी तर समजा अडचणींचा काळ संपला
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Krupa: शनिवार हा शनिदेव आणि हनुमानाला समर्पित दिवस मानला जातो. सामान्यतः शनि अतिशय क्रूर ग्रह असल्याचे म्हटले जाते, पण तसे नाही. खरे तर शनिदेव हे न्यायदेवता मानले जातात, ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. व्यक्तीच्या कर्मानुसार शिक्षा करतात किंवा वरदानही देतात.
प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी शनी साडेसाती, महादशा आणि अडीचकी इत्यादीतून जावे लागते. परंतु, तुमचे कर्म चांगले असेल तर या स्थितीतही तुमचे कधीही वाईट होणार नाही. म्हणूनच कर्म चांगले करावे, असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कर्मावर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळतो, तर त्याचे भाग्य उजळते. त्याचा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही.
advertisement
advertisement
भिक्षुक दिसणे - गरजूंना मदत केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी सकाळी एखादा भिकारी-भिक्षुक तुमच्या दारात आला तर त्याला कधीही शिवीगाळ करून हाकलून देऊ नका. हे खूप शुभ मानले जाते आणि शनिदेवाच्या कृपेचे लक्षण आहे. अशा वेळी आपल्या क्षमतेनुसार दान करून त्याला मदत करा. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात.
advertisement
advertisement


