advertisement

15 तारखेला महाशिवरात्री! 'या' 5 वस्तूंशिवाय अपूर्ण राहील शिवशंकराची पूजा, करू शकणार नाही महादेवाला प्रसन्न

Last Updated:
देवाधिदेव महादेवाच्या उपासनेचा महासोहळा म्हणजेच महाशिवरात्री. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात हे पावन पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे.
1/7
देवाधिदेव महादेवाच्या उपासनेचा महासोहळा म्हणजेच महाशिवरात्री. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात हे पावन पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, शिवपुराणानुसार भगवान शंकराची पूजा काही विशिष्ट गोष्टींशिवाय अपूर्ण मानली जाते.

2/7
बेलपत्र: बेलपत्राशिवाय शिवाची पूजा कधीही पूर्ण होऊ शकत नाही. तीन पानांचे अखंड बेलपत्र हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या त्यागाचे प्रतीक आहे. बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने अर्पण करावे. देठ तोडलेले असावे आणि पाने फाटलेली नसावीत.

3/7
धतुरा आणि भांग: धतुरा हे शिवाचे अत्यंत प्रिय फळ आहे. हे जगातील विषारी आणि नकारात्मक गोष्टी महादेवाने स्वीकारल्याचे प्रतीक आहे. धतुरा अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि शत्रूंवर विजय मिळतो. भांग ही मनाच्या एकाग्रतेचे प्रतीक मानली जाते.

4/7
भस्म: शिवाला 'भस्मलेपन' अतिशय आवडते. भस्म हे जीवनाच्या नश्वरतेचे आणि वैराग्याचे प्रतीक आहे.पूजेच्या शेवटी शिवलिंगाला भस्म अर्पण केल्याने किंवा कपाळावर भस्माचा टिळा लावल्याने मानवातील अहंकार नष्ट होतो आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते.

5/7
पांढरी फुले आणि चंदन: महादेवांना पांढरा रंग शांततेचे प्रतीक म्हणून प्रिय आहे. मोगरा, चमेली किंवा मंदारची पांढरी फुले पूजेत असावीत. पांढरे चंदन लावल्याने मनाला शीतलता मिळते. लक्षात ठेवा, महादेवाच्या पूजेत कधीही 'केतकी'चे फूल वापरू नका, कारण ते शिवपूजेत वर्ज्य आहे.

6/7
पंचामृत: शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते. दुधामुळे आरोग्य, दह्याने सुख, तुपाने समृद्धी, मधाने वाणीत गोडवा आणि साखरेने आनंद प्राप्त होतो. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करणे अनिवार्य आहे.

7/7
महाशिवरात्रीची कथा आणि जप: पूजेच्या साहित्यासोबतच या दिवशी महाशिवरात्रीची कथा वाचणे किंवा श्रवण करणे आवश्यक आहे. तसेच 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप केल्याशिवाय कोणत्याही विधीला पूर्णत्व येत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement