advertisement

आज महाशिवरात्री! 'या' रंगाचे कपडे बॅन, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे घालणं ठरेल शुभ?

Last Updated:
आज 15 फेब्रुवारी 2026, देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो. महादेवाची पूजा करताना आपण काय अर्पण करतो याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान करतो यालाही आहे.
1/7
आज 15 फेब्रुवारी 2026, देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो. महादेवाची पूजा करताना आपण काय अर्पण करतो याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान करतो यालाही आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगांचा आपल्या मनावर आणि ग्रहांच्या ऊर्जेवर खोल परिणाम होतो. महादेवाला काही रंग अत्यंत प्रिय आहेत, तर एक विशिष्ट रंग शिवपूजेत पूर्णपणे 'वर्ज्य' मानला गेला आहे.

2/7
'हा' एक रंग आहे पूर्णपणे बॅन: महाशिवरात्रीच्या पूजेत काळा रंग पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. ज्योतिषशास्त्रात काळा रंग शनी आणि राहूशी संबंधित आहे, जो अंधार आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शिव हे 'वैरागी' असले तरी, महाशिवरात्री हा त्यांच्या विवाहाचा मंगलमय उत्सव आहे. कोणत्याही शुभ कार्यात किंवा मांगलिक पूजेत काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही अशी धार्मिक धारणा आहे.

3/7
पांढरा - शांततेचे प्रतीक: महादेवांना पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे. ते स्वतः कर्पूरगौरं आहेत. पांढरा रंग सात्विकता, शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. पांढरे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने मन एकाग्र होते आणि महादेवाची कृपा लवकर प्राप्त होते.

4/7
हिरवा - निसर्ग आणि समृद्धी: शिवरात्रीला हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे, कारण महादेवाला निसर्ग प्रिय आहे. आपण महादेवाला हिरवे बेलपत्र आणि धूतर्फ अर्पण करतो. हिरवा रंग प्रगती आणि निसर्गाशी नातं जोडणारा आहे. या रंगाचे कपडे घातल्याने बुध ग्रहही बलवान होतो.

5/7
भगवा किंवा केशरी - वैराग्य आणि शक्ती: केशरी रंग हा अग्नी आणि त्यागाचे प्रतीक आहे. हा रंग अध्यात्मात प्रगती घडवून आणतो. महाशिवरात्रीच्या रात्री साधना किंवा मंत्रजप करणाऱ्यांसाठी केशरी वस्त्रे अत्यंत फलदायी मानली जातात.

6/7
पिवळा - आनंद आणि उत्साह: पिवळा रंग हा शुभ कार्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने गुरु ग्रहाचे पाठबळ मिळते. हा रंग सकारात्मकता वाढवतो आणि पूजेमध्ये उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतो.

7/7
लाल - शक्ती आणि सौभाग्य: जर तुम्ही विवाहित असाल, तर लाल रंग परिधान करणे अत्यंत शुभ आहे. लाल रंग माता पार्वतीचा प्रिय रंग असून तो ऊर्जेचे प्रतीक आहे. शिव-शक्तीच्या पूजेमध्ये लाल वस्त्रे अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement