Shani Astrology: 29 मार्चपासून सुरू होतेय 'या' राशीची साडेसाती, शनी हात धुवून लागणार मागे, काळजी घ्या!

Last Updated:
2025 वर्ष सुरू होऊन आता लवकरच 1 महिना पूर्ण होईल. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण वर्ष ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यातही अनेक ग्रहांचा राशीप्रवेश होईल. 
1/5
ज्योतिषशास्त्र सांगतं की, जेव्हा एखाद्या ग्रहाचा एखाद्या राशीत प्रवेश होतो तेव्हा त्याचा चांगला, वाईट प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. फेब्रुवारी महिन्यात एका राशीच्या व्यक्तींच्या वाट्याला वाईट काळ येण्याची शक्यता आहे. 

advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्चला त्याचा मीन राशीत प्रवेश होतोय. त्यातून मेष राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा काळ सुरू होणार आहे. 

3/5
मेष राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा पहिला टप्पा 29 मार्चपासून सुरू होत असून तो अडीच वर्षांचा असेल. त्याचं फळ कष्ट आहे, त्यामुळे हा काळ जरा कष्टदायक असण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी यावेळी कुठलीही घाई-गडबड न करता योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्यावे, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.

4/5
दरम्यान, साडेसाती हा अडचणींचा काळ मानला जातो. परंतु या काळात शनी आपल्याच पाप-पुण्याचा हिशेब करून त्याचं फळ देतो, असं म्हणतात. त्यामुळे साडेसातीचा काळ केवळ वाईटच नाही, तर चांगलाही असू शकतो. 

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement