101, 501, 1001 आहेर देताना का दिली जाते अशी रक्कम? 99% लोकांना माहिती नाही कारण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू परंपरेत, लग्न असो, वाढदिवस असो किंवा वास्तूशांती, कोणत्याही शुभ प्रसंगी आपण जेव्हा पाकिटात पैसे देतो, तेव्हा ती रक्कम कधीही 100, 500 किंवा 1000 अशी नसते.
advertisement
advertisement
भारतीय संस्कृतीमध्ये 'शून्य' हे पूर्णत्वाचे किंवा चक्र संपल्याचे प्रतीक मानले जाते. याउलट, 'एक' हा आकडा नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. शुभ कार्यात आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीची कामना करतो. जर आपण पूर्ण रक्कम दिली, तर ते तिथेच थांबल्यासारखे वाटते. पण त्यात 1 रुपया जोडला की ती रक्कम गतिमान होते, असे मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऋणाचे प्रतीक: काही जुन्या समजुतींनुसार, हा 1 रुपया 'ऋण' मानला जातो. याचा अर्थ असा की, समोरच्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याची आणि तो ऋण फेडण्याची संधी मिळावी. यामुळे भेटीगाठींचे आणि स्नेहाचे चक्र निरंतर सुरू राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







