हिंदू महिला नारळ का फोडत नाहीत? हे आहे खरं कारण
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
हिंदू महिला पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो.
हिंदू धर्मात नारळाला अत्यंत महत्व आहे. नारळ कोणत्याही शुभ प्रसंगी पूजला जातो आणि नारळ देवाची पूजा करून फोडला जातो. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतोच. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. पण महिला पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामागे नेमकं कारण काय आहे याबद्दलच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
महिला नारळ फोडत नाही, त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात. अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही, अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली.
advertisement
असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement