महाराष्ट्राचे गोविंदा 12 देशांवर भारी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लावले सर्वोच्च थर, उमटवली विजयाची मोहोर

Last Updated:
जन्माष्टमीला सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष असतो. परफेक्ट थरावर थर लावण्यासाठी गोविंदा अनेक दिवस प्रयत्न करतात. पडतात, जखमी होतात, परंतु या खेळातला उत्साह मात्र कमी होत नाही, तो जबरदस्तच असतो. म्हणूनच हा खेळ आता सातासमुद्रापार पोहोचलाय. तिथंही बाजी मारली आपल्या महाराष्ट्रातल्याच गोविंदांनी. 
1/5
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी महाराष्ट्रातील गोविंदांच्या संघाला स्पेनमध्ये नेलं. तिथं गोविंदा 'कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024' स्पर्धेत सहभागी झाले. मानवी मनोरे रचण्याच्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले गोविंदा अव्वल ठरले. 

advertisement
2/5
पुर्वेश सरनाईक आणि भारतीय शिष्टमंडळाने स्पेनमधील 'डेल पेनडेस विला फ्रांका' इथं प्रसिद्ध 'कॉनकुर फेस्टिवल'ला भेट दिली. हा सण मुंबई आणि ठाण्यात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाशी सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहे. इथंच मानवी मनोरे रचले जातात. याठिकाणी विला फ्रांका शहराच्या महापौरांनी पुर्वेश सरनाईक आणि भारतीय शिष्टमंडळाचं सन्माननीय पाहुणे म्हणून स्वागत केलं.

3/5
यावेळी महाराष्ट्राच्या संघाला 'कॅस्टेलर्स विला फ्रांका' या जगातील सर्वात यशस्वी मानवी मनोरे रचणाऱ्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात दोन्ही संघांनी एकत्र मनोरे रचण्याचा सराव केला आणि एकमेकांना आपल्या कौशल्याचं अदान-प्रदान केलं. 

4/5
या संपूर्ण दौऱ्याचं आयोजन आणि व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य दहीहंडी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, अभिषेक सुर्वे आणि गीता झगडे यांच्या नेतृत्त्वात उत्तमरीत्या पार पडलं. दौऱ्याचं मुख्य आकर्षण होतं 'कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024' स्पर्धेतील भारताच्या संघाचा भव्य विजय. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे अशा विविध 12 देशांचे संघ यात सहभागी झाले होते. स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर भारताचं नाव जागतिक पातळीवर गाजलं. 

5/5
पुर्वेश सरनाईक आणि भारतीय संघानं 'कॅस्टेलर्स विला फ्रांका' संघाचे अध्यक्ष अर्नेस्ट गॅलर्ट, माजी अध्यक्ष मिकेल फेरट आणि माजी संघ कर्णधार टोनी बाख यांचे आभार मानले. या सहयोगामुळे भारत आणि स्पेन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळाली असून मानवी मनोरे रचण्याच्या या कलेचं तांत्रिकदृष्ट्या अदान-प्रदान करण्यास फायदा होईल, असा विश्वास पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement