IPL 2025 Eliminator : ...तर मॅच न खेळताच Mumbai Indians होईल आयपीएलमधून बाहेर, BCCI चा नियम काय सांगतो?

Last Updated:
MI vs GT IPL 2025 Eliminator : आयपीएल 2025 मधील प्लेऑफचा सर्वात रोमांचक टप्पा, अर्थात एलिमिनेटर सामना, आता रंगात येणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना चौथ्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामात दमदार कामगिरी करत इथंपर्यंत मजल मारली आहे.
1/5
गुजरात आणि मुंबई या दोन्ही संघासाठी हा सामना त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असाच असणार आहे. या सामन्याचा विजेता क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश करेल, जिथं त्याला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल; मात्र जो संघ हरेल, त्याचा आयपीएलमधील प्रवास इथंच थांबेल.

advertisement
2/5
या महत्त्वाच्या सामन्यात एक अनपेक्षित आव्हान उभे राहिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या एलिमिनेटर सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवलेला नाही. याचा अर्थ असा की, जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे हा सामना रद्द झाला, तर एक टीम एक टीम बाहेर जाईल.

3/5
दोन्ही संघांपैकी कोणता संघ बाहेर पडेल? तुम्हाला माहितीये का? तर आयपीएलच्या नियमानुसार, लीग टप्प्यात चौथ्या स्थानावर असलेला संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडेल. या नियमाचा थेट परिणाम मुंबई इंडियन्सवर होणार आहे. लीग टप्प्यात गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे.

4/5
जर एलिमिनेटर सामना रद्द झाला, तर मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात येईल आणि गुजरात टायटन्स थेट क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश करेल. तिथे त्यांचा सामना क्वालिफायर-१ मधील पराभूत संघ पंजाब किंग्जसोबत होणार आहे.

5/5
दरम्यान, तर दुसरीकडे पंजाब किंग्जचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता क्वालिफायर 2 मध्ये कोणता संघ जिंकणार? असा सवाल देखील विचारला जात आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement