BSF मधून रिटायर्ड झाल्यावर सुरू केली शाळा, पदकांचा पडतोय पाऊस, लोकं आता म्हणतात बॉक्सिंग फॅक्टरी

Last Updated:
सीमा सुरक्षा दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर समाजाला अमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी एका सैनिकाने बॉक्सिंग प्रशिक्षण अकादमी उघडली. यानंतर काही दिवसांतच ही अकादमी इतकी प्रसिद्ध झाली की संपूर्ण राजस्थानातून मुलं इथे बॉक्सिंग शिकायला येऊ लागली. राजू बॉक्सिंग अकादमी असे या अकादमीचे नाव आहे. याठिकाणी मुले, तरुण आणि अगदी मुलींना बॉक्सर बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (अंकित राजपूत, प्रतिनिधी)
1/4
खेळामुळे माणसाच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक बदल होतात. तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आज, मोबाइल फोन हा खेळ आणि पुस्तकांवर हावी झाल्याचे बोलले जाते. मात्र, जर तुमच्यात आवड असेल तर तुमच्यात जग बदलण्याची क्षमता आहे. जयपूरमधील एका सैनिकाने असाच उत्साह दाखवला. त्यांनी आपल्या आवडीमुळे आज शेकडो मुलांना बॉक्सिंगमध्ये मास्टर बनवले आहे. हा सैनिक मुलांना बॉक्सिंग शिकवतो. येथील मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकत आहेत.

advertisement
2/4
जयपूरची राजू बॉक्सिंग अकादमी ही बॉक्सरची फॅक्टरी आहे. याठिकाणी 5-6 वर्षे ते 25 वर्षे वयोगटातील तरुण बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. राजू बॉक्सिंग अकादमीमध्ये अतिशय चांगली तयारी करुन घेतली जाते आणि शिस्तीने प्रशिक्षण दिले जाते. याच्याच जोरावर मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहेत. आतापर्यंत अकादमीतील 45 मुलांनी राष्ट्रीय खेळ केला आहे. त्याचबरोबर अनेक मुले व्यावसायिक बॉक्सिंगकडेही वळत आहेत.

3/4
राजू बॉक्सर हे 2006 मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये बॉक्सिंग स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत रुजू झाले होते. 2018 मध्ये त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली. बॉक्सिंगचे ध्येय ठेवून त्यांनी राजू बॉक्सिंग अकादमी सुरू केली. साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झालेली ही अकादमी आज संपूर्ण जयपूरमध्ये प्रसिद्ध झाली आहे. बॉक्सिंग शिकण्यासाठी राजस्थानातील विविध जिल्ह्यातील मुले येथे येतात. ज्या मुलांना खेळाची आवड आणि प्रतिभा आहे त्यांना मोफत बॉक्सिंग प्रशिक्षण दिले जाते. अकादमीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुमारे 35 मुले आहेत आहेत. त्या मुलांना मोफत वसतिगृहाची सुविधाही अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते.

4/4
राजू बॉक्सिंग अकादमीमध्ये लहान मुले आणि तरुणांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत येथील मुलांनी अनेक पदके जिंकली आहेत. यासोबतच राजू बॉक्सिंग अकादमीमध्ये मुलींसाठीही प्रशिक्षणाचीही सोय आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement