Vasai Virar News : ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले हितेंद्र ठाकूर, मुंबई पालिकेत आज चुकलंच

Last Updated:

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवत लॉटरी ठरवून केली,ओबीसींवर अन्याय केला,असे आरोप केले होते. अशाच प्रकारची भूमिका आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी घेतली आहे.

hitendra thakur
hitendra thakur
Vasai Virar News : राज्यातील 29 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज सोडत काढण्यात आली.नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली होती.या सोडतीनुसार मुंबईच्या महापौपदी खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार विराजमान होणार आहे. या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवत लॉटरी ठरवून केली,ओबीसींवर अन्याय केला,असे आरोप केले होते. अशाच प्रकारची भूमिका आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी घेतली आहे.
खरं तर मुंबईप्रमाणे वसई विरारला महापौर निवडणुकीसाठी
सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मिळाले होते.या आरक्षणावर आता हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुंबईच्या व वसई विरार च्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा असून, हे नियम विशिष्ट समाजावर अन्याय करणारे असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावेळी ST महिला आरक्षण पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याचेही त्यांनी नमूद केले. जनरल जागेवर ST प्रवर्गातून उमेदवारी दिल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
तसेच आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असे वाटत नाही. पण नियम चुकीचे आहेत. दबावाचे कसं काय असू शकेल शेवटी लोकांसमोर चिठ्ठ्या पडल्या आहेत,असे देखील हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. वसई विरार महानगरपालिकेसाठी बहुजन विकास आघाडीत अनेक दिग्गज निवडून आले आहेत. महापौरपदासाठी अनेक सक्षम चेहरे उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वजण बसून निर्णय घेऊ, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
advertisement
दरम्यान, पालिकेत आमच्या पक्षाचे स्पष्ट बहुमत असताना, बॉडीचा विचार न करता सफाई कामगारांचा ठेका काढून घेण्यात आला, ही बाब चुकीची असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांमुळे वसई-विरारच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
आरक्षणावर ठाकरेंची भूमिका काय?
मागील दोन महापौर खुल्या वर्गातील होते. त्यामुळे नव्या महापौरांची निवड इतर मागासवर्गीय (ओबीसी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) वर्गातून व्हायला हवी होती. ज्या पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली,त्याचा आम्ही निषेध करतो असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar News : ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले हितेंद्र ठाकूर, मुंबई पालिकेत आज चुकलंच
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement