advertisement

T20 World Cup : 6 फूट 8 इंचाचा क्रिकेटर काळ बनून आला, चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला दिवसा तारे दाखवून गेला!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये शुक्रवारी सगळ्यात मोठा उलटफेर झाला. झिम्बाब्वेने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासमोर ग्रुप स्टेजलाच आऊट व्हायचं संकट उभं ठाकलं आहे.
1/7
झिम्बाब्वेच्या 6 फूट 8 इंचाच्या बॉलरने ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडून त्यांना गुडघ्यावर आणलं. भेदक स्पीड आणि अचूक लाईन ऍन्ड लेन्थने बॉलिंग करत त्याने ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग एक धक्के दिले, ज्यातून कांगारू कधी सावरलेच नाहीत.

2/7
झिम्बाब्वेच्या या विजयाचा हिरो ठरला ब्लेसिंग मुझरबानी. 6 फूट 8 इंच उंची असणाऱ्या मुझरबानीने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 4 विकेट घेतल्या. मुझरबानीची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

3/7
मुझरबानीने त्याच्या स्पेलमध्ये जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, मॅट रॅनशो आणि ऍडम झम्पा यांची विकेट घेतली. करिअरमधल्या या सर्वोत्तम कामगिरीमुळे ब्लेसिंग मुझरबानीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

4/7
उंचीमुळे मुझरबानीला बॉलिंगमध्ये बाऊन्स मिळतो, ज्यामुळे बॅटर अनेकदा अडचणीत येतात. मुझरबानीच्या या कौशल्यामुळे तो झिम्बाब्वेकडून टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो.

5/7
मुझरबानीच्या या भेदक बॉलिंगमुळे आरसीबीने त्याला मागच्या मोसमात विकत घेतलं. लुंगी एनगिडीला दुखापत झाल्यानंतर आरसीबीने मुझरबानीला 75 लाख रुपयांमध्ये टीममध्ये आणलं, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

6/7
जगभरातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये मुझरबानीने स्वत:ची ओळख निर्माण केली. याचा फायदा त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झाला. 2017 साली मुझरबानीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

7/7
मुझरबानीने झिम्बाब्वेकडून 18 टेस्ट, 57 वनडे आणि 85 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे. टेस्टमध्ये त्याने 26.20 च्या सरासरीने 67 विकेट घेतल्या. तर वनडेमध्ये 33.35 च्या सरासरीने 70 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 21.08 च्या सरासरीने आणि 7.10 च्या इकोनॉमी रेटने 100 विकेट मिळवल्या.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement