advertisement

Gold : नशिबाचा खेळ, कचऱ्याच्या डब्यात फेकले 12 लाखांचे सोने, 3 दिवसांनी दारात पोलीस आले अन्... घटनेनं सगळ्यांनाच हादरवलं

Last Updated:

असाच काहीसा थरार एका भारतीय कुटुंबासोबत घडला. एका साध्याशा चुकीमुळे 12 लाख रुपयांचे सोने कचऱ्यात गेले, पण त्यानंतर जे घडले ते पाहून तुमचा 'माणुसकी' आणि 'प्रामाणिकपणा'वरचा विश्वास अधिक घट्ट होईल.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : माणसाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही, पण कधीकधी एका छोट्याशा चुकीमुळे कष्टाची कमाई मातीमोल होण्याची वेळ येते. आपण अनेकदा घरातील जुन्या वस्तू किंवा कचरा बाहेर फेकताना घाई करतो. पण विचार करा, जर तुम्ही चुकून कचऱ्याच्या पिशवीत लाखो रुपयांचे सोने फेकून दिले तर? कोणाचेही हातपाय गळतील आणि पुन्हा ते सोने मिळेल ही आशा तर कोणी स्वप्नातही ठेवणार नाही.
असाच काहीसा थरार एका भारतीय कुटुंबासोबत घडला. एका साध्याशा चुकीमुळे 12 लाख रुपयांचे सोने कचऱ्यात गेले, पण त्यानंतर जे घडले ते पाहून तुमचा 'माणुसकी' आणि 'प्रामाणिकपणा'वरचा विश्वास अधिक घट्ट होईल.
ही गोष्ट आहे कामिनी कन्नन यांची, ज्या 23 वर्षे दुबईत राहिल्यानंतर 2021 मध्ये भारतात परतल्या होत्या. जानेवारी 2024 च्या अखेरीस त्या एका लग्नासाठी पुन्हा दुबईला गेल्या होत्या. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना कामिनी यांनी त्यांच्याकडे असलेले जुने सोने तपासून पाहण्याचे ठरवले. त्यांच्याकडे 22 कॅरेटचे 4 सोन्याचे शिक्के (प्रत्येकी 8 ग्रॅम) आणि 50 ग्रॅमचे 24 कॅरेटचे सोन्याचे बिस्किट होते. ज्या पाऊचमध्ये हे सोने ठेवले होते, ते जुने झाल्यामुळे त्यांनी ते सिक्के काढून एका नवीन पाऊचमध्ये ठेवले आणि तो पाऊच डायनिंग टेबलवर ठेवला.
advertisement
पण दुसऱ्या दिवशी टेबलवर ठेवलेला तो सोन्याचा पाऊच गायब होता. शोध घेतल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. घरातील साफसफाई करताना कामिनी यांच्या मुलाने तो पाऊच 'कचरा' समजून चुकून डस्टबिनमध्ये फेकला होता. 12 लाख रुपयांचे सोने आता शहराच्या कचरा डेपोमध्ये कुठेतरी ढिगाऱ्यात गेले होते. कामिनी यांनी पुन्हा सोने मिळेल ही आशा सोडून दिली होती, तरीही त्यांनी बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला याची कल्पना देऊन ठेवली.
advertisement
विशेष म्हणजे इतके मोठे नुकसान होऊनही या कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली नव्हती, कारण त्यांना वाटले की कचऱ्यात गेलेले सोने आता कधीच मिळणार नाही. पण 4 फेब्रुवारी रोजी अचानक कामिनी यांचा मुलगा अभिमन्यू याला बिल्डिंगच्या गार्डचा फोन आला. गार्डने सांगितले की, "तुमच्या हरवलेल्या सामानाबद्दल चौकशी करण्यासाठी काही लोक आले आहेत."
दुबई पोलिसांनी त्यांच्या अत्याधुनिक 'कचरा ट्रॅकिंग सिस्टीम'च्या (Waste Tracking System) मदतीने तो पाऊच शोधून काढला होता. इतकेच नाही तर तांत्रिक तपासाद्वारे या सोन्याचा खरा मालक कोण आहे, याचाही शोध घेतला. नाईफ पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक कागदपत्रे दाखवल्यानंतर, 12 लाखांचे ते सोने कामिनी यांच्या कुटुंबाला सुखरूप परत करण्यात आले.
advertisement
ही केवळ सोन्याची गोष्ट नाही, तर ती प्रामाणिकपणा आणि तंत्रज्ञानाच्या अचूक वापराची कथा आहे. दुबई पोलिसांच्या मदतीमुळे एका कुटुंबाची आयुष्यभराची पुंजी वाचली. ही घटना आपल्याला शिकवते की, संकट कितीही मोठे असले तरी आशा सोडू नका आणि प्रामाणिक यंत्रणा आजही अस्तित्वात आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold : नशिबाचा खेळ, कचऱ्याच्या डब्यात फेकले 12 लाखांचे सोने, 3 दिवसांनी दारात पोलीस आले अन्... घटनेनं सगळ्यांनाच हादरवलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement