Tips And Tricks : तवा काळाकुट्ट झालाय? चिंता करू नका; 'ही' ट्रिक ट्राय करा, 10 मिनिटांत पूर्वीसारखा चमकेल..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to remove black layer from pan : तव्याचा वापर रोजच्या असल्यामुळे त्यावर साहजिकच तेल खूप प्रमाणात लावलं जातं. या तेलामुळे तव्यावर हळूहळू एक काजळी म्हणजेच तेलाची काळी लेयर जमा होऊ लागते.
मुंबई : भारतीय घरांमध्ये जवळपास रोज दोनवेळा चपात्या बनवल्या जातात. अशात तो तवा दिवसातून एकदाच घासला जातो. पण हळूहळू तो तवा काळा होतो आणि तो एकदा का काळा झाला तर घासणं खूप अवघड होऊ जातं. पण तुम्ही काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्या तव्याची काजळी काढण्यात मदत करतील.
तव्याचा वापर रोजच्या असल्यामुळे त्यावर साहजिकच तेल खूप प्रमाणात लावलं जातं. या तेलामुळे तव्यावर हळूहळू एक काजळी म्हणजेच तेलाची काळी लेयर जमा होऊ लागते. हा तेलाचा थर तव्याला घट्ट चिकटून बसवत आणि नंतर तो फक्त साबण आणि पाणी वापरून काढणं खूप अवघड होतं. अशावेळी काही घरगुती उपाय उपयोगी पडतात.
तव्याची काजळी काढण्यासाठी वापरा या टिप्स..
advertisement
शॅम्पू आणि लिंबू : तव्याची काजळी लढण्यासाठी तुम्ही शॅम्पू आणि लिंबू वापरू शकता. सर्वप्रथम एक शॅम्पूची पुडी घ्या. त्यात मीठ, लिंबाचा रस आणि डिश वॉश घाला. आता तवा गरम करू त्यावर शॅम्पू घाला. नंतर मीठ आणि पाणी टाकून ते गरम होऊ द्या. आता लिंबाचा रस घाला आणि ते थोडावेळ 10 मिनिट तसेच राहू द्या. यातील मिश्रण थोडे कमी करून आता उरलेल्या मिश्रणाने तवा स्टील स्क्रबर वापरून चांगला घासा.
advertisement
टूथपेस्ट : शॅम्पू व्यतिरिक्त तुम्ही टूथपेस्ट वापरूनही तवा स्वच्छ करू शकता. पूर्ण पॅनवर टूथपेस्ट लावा. 5 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्टील स्क्रबरने किंवा जुन्या फॉइल पेपरने घासून घ्या. शेवटी डिशवॉशने घासून तवा स्वच्छ करा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर : तवा चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिंबू वापरू शकता. यासाठी तव्यावर पाणी, बेकिंग सोडा, लिंबू किंवा व्हिनेगर टाकून उकळवा. आता ही काजळी स्टीलच्या स्क्रबरने घासून स्वच्छ करा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 7:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : तवा काळाकुट्ट झालाय? चिंता करू नका; 'ही' ट्रिक ट्राय करा, 10 मिनिटांत पूर्वीसारखा चमकेल..









