advertisement

T20 World Cup : टीम इंडिया नाही तर पाकिस्तान सेमी फायनलला जाणार? 24 तासात फिरला अख्खा वर्ल्ड कप!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला, तर पाकिस्तानला लाईफलाईन मिळाली.
1/8
सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 रननी पराभव केला, त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानला मात्र नशिबाने साथ दिली आहे. शनिवार आणि रविवारच्या 24 तासांमध्येच वर्ल्ड कपमध्ये हा उलटफेर झाला आहे.

2/8
एवढा मोठा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट हा मायनस 3.800 एवढा झाला आहे. 3 पैकी 3 सामने जिंकणारी टीम सेमी फायनलमध्ये थेट प्रवेश करेल, तर 2 सामने जिंकणाऱ्या टीमला दुसऱ्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

3/8
दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि भारताने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचा पराभव केला तर दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. पण दक्षिण आफ्रिकेने एक सामना जरी गमावला तर नेट रनरेट महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्याचा फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे.

4/8
भारतीय टीम झिम्बाब्वेविरुद्ध गुरूवार 26 फेब्रुवारीला मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 1 मार्चला होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे.

5/8
भारताने त्यांचे दोन पैकी दोन सामने जिंकले तरी त्यांना सेमी फायनलसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल, पण दुसरीकडे पाकिस्तानने मात्र त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले तरी ते सेमी फायनलला पोहोचू शकतील.

6/8
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट दिला गेला. तसंच यामुळे पाकिस्तानच्या नेट रनरेटवरही कोणताच परिणाम झाला नाही. पाकिस्तानचे उरलेले सामने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत, या दोन्ही सामन्यात विजय मिळाला तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल.

7/8
पाकिस्तानचा इंग्लंड किंवा श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला तर मात्र त्यांचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल. पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्धचा सामना 24 फेब्रुवारीला आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना 28 फेब्रुवारीला होईल.

8/8
सुपर-8 मधल्या ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधून टॉपच्या प्रत्येकी 2-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील, पण सध्याचं समीकरण बघता टीम इंडियाऐवजी पाकिस्तानच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement