Panipuri Benefits : आता बिनधास्त खा पाणीपुरी! समोर आले धक्कादायक फायदे; वाचाल तर एक प्लेट एक्ट्राच मागवाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याचदा आपल्याला वाटतं की पाणीपुरी म्हणजे फक्त जंक फूड, पण जर ती स्वच्छ पद्धतीने बनवली असेल, तर या चटपटीत पदार्थात अनेक पोषक घटक दडलेले आहेत. आज आपण पाणीपुरीचे असेच काही अनपेक्षित फायदे जाणून घेणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल!
गरमी असो वा पाऊस, किंवा कडक हिवाळा... पाणीपुरी प्रत्येक सिजनमध्ये बेस्ट आहे. तिचं नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं! चटपटीत पाणी, कुरकुरीत पुरी आणि त्यात भरलेले मसालेदार बटाटे-चणे... हा अनुभव घेण्यासाठी आपण कितीही लांब जायला तयार असतो. पण, तुम्हाला माहित आहे का, ही फक्त जिभेची चटक नाही तर आरोग्यासाठीही पाणीपुरीचे काही छुपे फायदे आहेत
advertisement
advertisement
मूड फ्रेशनर आणि स्ट्रेस बस्टरदिवसभराच्या कामामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुमचा मूड खराब झाला आहे का? किंवा तुम्ही थोड्या तणावाखाली आहात? तर मग एक प्लेट पाणीपुरी नक्की मुड बदलतो. पाणीपुरीतील तिखट, आंबट आणि गोड चव तुमच्या जिभेला उत्तेजित करतो आणि एंडोर्फिन (Endorphins) नावाचे हॅपी हार्मोन्स (Happy Hormones) सोडण्यास मदत करतो. यामुळे तुमचा मूड लगेच फ्रेश होतो आणि तणाव कमी व्हायलाही मदत होते.
advertisement
पचनास मदत करते (योग्य प्रकारे बनवल्यास)विश्वास बसणार नाही, पण पाणीपुरीतील काही घटक पचनासाठी चांगले असू शकतात. पाणीपुरीचे पाणी (जलजीरा पाणी) जिरे, पुदीना, आलं, हिरवी मिरची आणि काळ्या मिठाने बनवलेले असते. हे सर्व पदार्थ पचन सुधारण्यास मदत करतात. जिरे आणि पुदीना गॅस कमी करण्यास मदत करतात, तर आलं पचनशक्ती वाढवते. मात्र, यासाठी पाणीपुरीचे पाणी ताजे आणि स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.
advertisement
डिहायड्रेशनवर उपाय (उन्हाळ्यात विशेषतः)उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा वेळी पाणीपुरीचे मसालेदार आणि थंडगार पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. लिंबू, पुदीना आणि जलजिरा पावडर असलेले पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राखण्यास मदत करते आणि शरीराला ताजेतवाने करते.
advertisement
प्रतिकारशक्ती वाढवते (काही प्रमाणात)पाणीपुरीच्या पाण्यात वापरले जाणारे काही घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, आलं आणि हिरवी मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पुदीना आणि कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात. अर्थात, हे प्रमाण कमी असले तरी ते एक लहान पूरक म्हणून काम करू शकते.
advertisement
नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला मदतकाही प्रमाणात पाणीपुरीचे पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन (Detoxification) म्हणून काम करू शकते. पुदीना, जिरे आणि लिंबू यांसारखे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि यकृत (Liver) निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता होऊन तुम्हाला हलके वाटते.
advertisement







