advertisement

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड

Last Updated:

Mumbai Police: हद्दपार केल्यानंतरही पुन्हा मुंबईत बेकायदेशीरपणे परतणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. राज्यभरात कारवाई तीव्र करण्यात आली असून शेकडो जणांना पुन्हा देशाबाहेर पाठवण्याची तयारी सुरू आहे.

(AI फोटो)
(AI फोटो)
मुंबई: मुंबई पोलिसांनी अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई तीव्र केल्यानंतर एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. बांगलादेशात हद्दपार केलेल्या काही महिलांनी पुन्हा बेकायदेशीररित्या मुंबईत प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकरणांत वाढ झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.
सहा महिन्यांत पुन्हा मुंबईत
मिरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करताना पकडलेली 46 वर्षीय राबिया नासिर मुल्ला हिला ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेशात पाठवण्यात आले होते. मात्र अलीकडेच ती पुन्हा मुंबईत परतल्याचे समोर आले. विल्हे पार्ले (पश्चिम) परिसरात तिला पुन्हा अटक करण्यात आली असून, आता तिच्या पुनर्हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे.
राबियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती मागील वर्षी राज्यभरातील सुमारे 1,600 बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार झाली होती. मात्र त्यानंतर तिने जंगलमार्गे सीमारेषा ओलांडून भारतात पुन्हा प्रवेश केला. गेली 25 वर्षे ती मिरा-भाईंदरमध्ये घरकाम करून राहत होती.
advertisement
दक्षिण मुंबईतही कारवाई
गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून दोन महिलांना अटक करण्यात आली. 38 वर्षीय जुलेखा जमाल शेख हिला गेटवे ऑफ इंडिया परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ती ऑगस्ट 2025 मध्ये हद्दपार झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याआधी ती कामाठीपुरा परिसरात फुटपाथवर राहत होती.
30 वर्षीय बिल्कीस बेगम सिर्मिया अख्तर हिला कफ परेड भागातून अटक करण्यात आली. तिलाही मुंबई गुन्हे शाखेने गेल्या वर्षी बांगलादेशात पाठवले होते. मात्र काही महिन्यांतच ती पुन्हा शहरात आल्याचे समोर आले.
advertisement
अंधेरीत 21 जण ताब्यात
गेल्या आठवड्यात वर्सोवा पोलिसांनी अंधेरी (पश्चिम) परिसरातून 21 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये 18 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. संबंधित सर्व जण बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यांच्याविरोधात परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आला असून, पुढील कारवाईनंतर त्यांनाही हद्दपार केले जाणार आहे.
सीमासुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल सीमेवरील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हद्दपार केलेल्या काही जणांनी लाच देऊन किंवा जंगलमार्गे पुन्हा भारतात प्रवेश केल्याचा संशय आहे.
advertisement
गेल्या दोन वर्षांत राज्यभरात 1,237 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 2025 मध्येच हजाराहून अधिक जणांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिली. 93 पोलिस ठाण्यांना सातत्याने कारवाईचे आदेश देण्यात आले असून, 2026 मध्ये पकडलेल्या शेकडो जणांचीही लवकरच पुनर्हद्दपारी होणार आहे.
कारवाई आणखी कडक
मुंबई महानगर प्रदेशासह राज्यभरात अवैध स्थलांतरितांविरोधातील मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांना गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हद्दपारीनंतर पुन्हा बेकायदेशीर प्रवेश होत असल्याच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, सीमावर्ती भागातील समन्वय वाढवण्यावर भर दिला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement