advertisement

पती-पत्नी दोघांचीही खुर्ची धोक्यात! दोन मतदार याद्यांत नाव असणं केदार दाम्पत्याला नडलं; सोलापुरात खळबळ

Last Updated:

विरोधकांकडून या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली जात असून आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News18
News18
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य चेतनसिंह केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांची पत्नी सुजाता केदार यांचे नगरपालिकेचे सदस्यत्वही रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
चेतनसिंह केदार हे सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सदस्य असून सध्या ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नी सुजाता केदार या शहरातील नगरपालिकेत नगरसेविका आहेत. मात्र, दोघांचीही नावे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदार याद्यांमध्ये नोंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 31 नुसार एका व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये असू शकत नाही. या तरतुदीचे उल्लंघन झाल्याने चेतनसिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व तसेच सुजाता केदार यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
advertisement

सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी

ही याचिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आर. वाय. घुटुकडे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत केदार दाम्पत्याने कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालय या प्रकरणावर कोणता निर्णय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement

आगामी निवडणुकीत  पडसाद उमटण्याची शक्यता

दरम्यान, या घडामोडीमुळे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच जिल्हाध्यक्षांवरच सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आल्याने भाजपच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. विरोधकांकडून या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली जात असून आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पती-पत्नी दोघांचीही खुर्ची धोक्यात! दोन मतदार याद्यांत नाव असणं केदार दाम्पत्याला नडलं; सोलापुरात खळबळ
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement